डोनेट एड सोसायटी उपक्रम

दिव्यांगास देऊ आपण आधार,नव्या उमेदीने करू त्यांचे स्वप्न साकार!

आशादीप

दिवाळी आली कोरोनाची मनातली भीती थोडी दूर सरली अन् बाजारपेठ माणसांनी फुलून गेली. ही शहरातील, गावातील कहाणी झाली. परंतु आजही असे अनेक दुर्गम भाग आहेत की जिथे सगळ्याचीच कायम कमतरताच भासली. त्याही परिस्थितीत तुमच्या आमच्या सारख्या धडधाकट माणसांची गोष्टच वेगळी. अन् दिव्यांगांची तर कहाणीच निराळी. /p>

गडचिरोलीच्या दुर्गम भागात शंकर दुर्गे व चिन्नाका दुर्गे हे दिव्यांग दांपत्य राहते. त्यांना आधार देणारे अन्य कुणी नाही. उदरनिर्वाहासाठी ते शिलाई काम करत होते. पण शिलाई मशिन अभावी व सध्याच्या अडचणीच्या काळात या दांपत्याची स्थिती अधिकच बिकट झाली.

सुदिप या सेवाभावी कार्यकर्त्याने यांची परिस्थिती समजून घेतली. पुण्यातील डोनेट एड सोसायटी या सेवाभावी संस्थेशी मदतीविषयी संपर्क साधला. सध्या या संस्थेमार्फत दिव्यांगाना देऊ स्वावलंबनासाठी आधार अशा पद्धतीचा उपक्रम किशोरीताई व नितीन सर व दास टीम स्वतः पुढाकार घेऊन आकारास आणत आहे.

सुदीप हे अतिशय क्रियाशील कार्यकर्ता व त्यांची टीम येथे दुर्गम भागात काम करत आहे नितीन शेलार सर यांच्यामुळे ह्या कार्यकर्त्याच्या कामाची माहिती मिळाली व निखील कोळी यांनी देखील तिथे बरीच मदत ह्या दुर्गम भागात पोहचवली आहे.

किशोरीताईंनी या दांपत्याची गरज ओळखून देणगीदारांना मदतीचे आवाहन केले. सुलभाताई धांडे यांच्या स्मरणार्थ दात्यांनी देणगीरूपात शिलाई मशिन मोटरसहित डोनेट एड सोसायटी च्या माध्यमातून दिली.

शिलाईचे व काम पुरवण्याची जबाबदारी सुदिप व गडचिरोली ची टीम घेणार आहे.
हो कारण कुणीतरी कायम स्वरुपी माध्यम तर हवेच. तर यांना शिलाई काम व त्याचा योग्य तो मोबदला कायम स्वरुपी मिळत राहिल.

दिवाळीच्या ह्या महिन्यात सुमुहूर्तावर या शिलाई मशिनमुळे ह्या दांपत्याला स्वावलंबनाचा मार्ग लाभला आहे. शिलाई मशीन एवढ्या दुर्गम भागात पोहचवणे अतिशय जिकरीचे काम होते पण शिलाई मशीन विक्रेते कुरेशी सर व सुदीप सर यांनी अथक प्रयत्नांनी तिथं पर्यन्त पोहचवली.

खरंच अश्या दुर्गम भागात मदतीचा ओघ वाढणे फार गरजेचे आहे त्यासाठी दास टीम मनापासून प्रयत्न करत आहेत या मार्गावर यशस्वी होण्यासाठी आशेचा दीप त्यांच्या मनात उजळण्याचे श्रेय डोनेट एड सोसायटी ला नक्कीच आहे. हा आशादीप अखंड तेवत राहो व या दिव्यांग दांपत्याचे जीवन सुकर होवो हीच सदिच्छा

लेखन
सौ.प्रिया जोग
११.११.२०२०

डोनेट एड सोसायटीचे सेवाकार्यडोनेट एड सोसायटी उपक्रम

दिव्यांगास देऊ आपण आधार,नव्या उमेदीने करू त्यांचे स्वप्न साकार!

माई बालभवन ही केवळ एक संस्था नसून ते एक घरकुल आहे. अनाथ ,अंध, मूकबधीर, दिव्यांग त्याशिवाय एच आय व्ही पॉसिटिव अशा अनेक प्रकारच्या निराधार मुला- मुलींसाठी एक भक्कम आधार देणारे हे घरकुल आहे.

या सर्व मुला मुलींचे शिक्षण आरोग्य व त्यांचे पुनर्वसन या तीन गोष्टींवर प्रामुख्याने भर देऊन त्यांचे आपुलकीने संगोपन केले जाते.

योग्य व अनुकूल होतकरु तरुणाबरोबर लग्नही लावून दिले जाते. असे ३० विवाह आजवर यशस्वी झाले आहेत.

या मुलींच्या आरोग्यासाठी योगा व प्राणायामवर्ग ही घेतले जातात. तसच या मुलींना शिवणकाम, बास्केट विणणे अशा कलाही शिकवल्या जातात. संगणक प्रशिक्षण ही दिले जाते, बँकेच्या नोकरीसाठी त्यांची व्यवस्थित तयारी करुन घेतली जाते. त्यासाठी वाचक व लेखनिक यांचीही व्यवास्था करण्यात येते. ह्या मुलं मुलींना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी माईंची अविरत धडपड चालू असते.

माईंचे व किशोरी ताईंचे मुलींसाठी अजून काही करता येईल का ह्यावर चर्चा झाली.तसेच ह्या उपक्रमाद्वारे मुलींना रोजगार कसा मिळू शकतो, त्यांच्या निकषानुसार नितीन सर व किशोरी ताई ह्यांनी दास च्या मार्फत माईबाल भवन ला पार्लर ची खुर्ची देण्याचे योजिले.

यामुळे संस्थेच्या मुलींना मसाज व इतर ब्युटी पार्लरच्या कोर्स शिकण्यास मदत मिळणार आहे. तसेच ही कला आत्मसात केल्यावर त्यांना चांगल्या निसर्ग उपचार केंद्रात किंवा स्वतःचा व्यवसाय मुली सुरू करू शकतात व त्यामुळे स्वावलंबन च्या दिशेने पाऊले टाकण्यासाठी अजून एक नवीन मार्ग दास व दात्यांच्या च्या तर्फे मिळाला.

दिव्यांग मुलांना सक्षम बनवण्याचा हा एक प्रयत्न डोनेट एड सोसायटीने घेतलेला हा नवीन प्रोजेक्ट खूपच स्तुत्य आहे.

किशोरी ताईंची यांची मैत्रीण स्वातीताई यांनी त्याच्या मुलाच्या दिव्यांश नायक वाढदिवसाच्या निमित्ताने पार्लर ची फोल्डेबेल खुर्ची डोनेट एड सोसायटी च्या माध्यमातून दिली. पण अशा बिकट सेवादीप व डोनेट एड सोसायटी ह्या समाजसेवी संस्था भक्कम पाठिंबा देत आहेत. माईबाल भवन तर्फे दास व दाते नायक कुटुंब यांचे आभार व दिव्यांश ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

संस्थेची माहिती:
यशोगाथा

धैर्याला ला उभर
आयुष्या ला आकार
दिव्यांगांचे व निराधारांचे स्वप्न करु साकार

संस्थेचे नाव :माई बाल भवन 
संस्थापक : प्रतिज्ञा देशपांडे
संस्था स्थापनेचा दिनांक : 02 जून 2006
पत्ता : 
संपर्क : आष्ट विनायक सोसायट्य रोव हौसे नो ५ शितालानाग्र देहूरोड पुणे ४१२१०१ 
लाभार्थी विद्यार्थी संख्या : 40
एकूण कार्यकर्ता संख्या : 4
एकूण वैयक्तिक व संस्था पुरस्कार : 52


संस्थेचा इतिहास‘’माई बाल भवन ‘’ध्येयाला उभार ..आयुष्याला आकार देण्याचे कार्य करते दिव्यांग व अनाथ मुला..मुलींन बरोबर त्यांचे आयुष्य घडवण्याचे काम ‘’माई बाल भवन’’ संस्था अतिशय जोमाने करते. आम्ही १८ वर्षावरील युवक युवती बरोबर काम सुरु करण्या अगोदर मावळा पासून ते मुंबई नागपुरा पर्यन्त सर्व्हे केला त्यात प्रमुख्याने आढळलेली गोष्ट म्हणजे दिव्यांग व्यक्ती यांना रोजगार , काम, मिळत नाही. घरचे, समाजातील, व्यक्ती सरकार मदत करताना आतिशय उदासीन असल्याचे जाणवले. महत्वाचे म्हणजे भारत कितीही विकसीत देश असला तरी तो अंधश्रद्धेत ग्रासलेला देश आहे. महाराष्ट्रात खूप जिल्हे उदा. मराठवाडा, विदर्भ, सातारा, सांगली,नागपूर, असे अनेक जिल्हे आहेत जे अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकले आहे. समाजातील अनेक लोक दिव्यांगानी स्वतंत्र जगावे यासाठी प्रयत्न करत नाही तर ते देव व माणसातील दुवा म्हणून त्यांच्या स्वीकार करतात.

दिव्यांग फार कमी प्रमाणात स्वंतत्र जगताना आढळतात. जे जगतात ते सुद्धा वेगवेगळ्या दानशूर संस्थेमध्ये जाऊन महिन्याचा शिधा, पैसे, गोळा करण्यासाठी फिरतात कारण त्यांना नोकऱ्या नाही आणि आपण देत सुद्धा नाही त्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्याची त्यांची हिमंत असेल तर बँक कर्ज देत नाही पुन्हा दारोदारी भटकण्याची वेळ त्यांच्यावर येते ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास ‘‘’माई बाल भवन’’ संस्थेने केला व वेगवेगळ्या व कार्यशाळाना भेटी दिल्या त्यात लक्षात आले कि त्यांनी जे हंगामी ट्रेनिंग घेतले त्याचा त्यांच्या जीवन जगण्यात काडीचा हि उपयोग होत नाही.

म्हणून ‘’माई बाल भवन’’ संस्था १८ वर्षावरील दिव्यांग व अनाथ मुला..मुलींन बरोबर बरोबर तीन मुद्यांवर काम सुरु केले.

 • १) आरोग्य
 • २) शिक्षण
 • ३) रोजगार

१) आरोग्य : - अपंग व्यक्तीचे आरोग्य उत्तम असेल तरच दिव्यांग व अनाथ व्यक्ती निरोगी राहू शकतात व काम करू शकतात.म्हणून संस्थेने युवक युवतीचे आरोग्य, उत्तम राहण्यासाठी रोज सकाळी १ते २ तास योग घेतला जातो.त्या मध्ये सर्वांग आसन,सूर्यनमस्कार,घेतले जातात.मुला मुलींची रोगप्रतिकार शक्ती वाढलेली जाणवते. सर्दी,पडसे,खोकला,ह्या त्रासापासून सर्वजण वंचित आहेत. हा आमचा अनुभव आहे गेल्या पाच वर्षाचा, अवाढव्य वाढलेले शरीर कमी झाले,व कमी वजन असल्याचे वजन वाढले आहे.मना वरचा ताण कमी झाल्याचा जाणवत, हे काम ‘’माई बाल भवन’’ करते.

२) शिक्षण : - शिक्षणासाठी संस्थेचे शाळा,कॉलेज नाही.पण जी शाळा, कॉलेज,उपलब्ध आहे. तिथे १०वि,पासून ते एम.ए. पर्यन्तचे विद्यार्थी शिक्षण घेत आहे.विद्यार्थ्याना अभ्यास रेकोर्ड करून देणे, ओडीओ ,शैक्षणिक साधन सामुग्री ,अभ्यासासाठी वाचकांची व्यवस्था केली जाते. दिव्यांगाना परीक्षेच्या वेळेस लेखनिक पुरवण्याची, व्यवस्था देखील संस्था जाणीवपूर्वक करते. विद्यार्थी वर्गाचे कुढल्याही प्रकारे नुकसान होऊ नये याची काळजी घेतली जाते.

३) रोजगार : - ’’माई बालभवन’’ सरकारी,बँका,खाजगी,कंपन्या,आयटी, या ठीकाणी विद्यार्थ्याना स्वतः रोजगार शोधण्यास प्रोत्साहन देतो. व त्याच्याकडून अभ्यासाची तयारी करून घेतली जाते,मुलाखतीला जाताना पेहरावा कसा घालावा? कसे बोलावे म्हणजेच त्याचा आत्मविश्वास वाढवण्याचे काम ‘’माई बाल भवन’’ करते. व सरकारी, निमसरकारी,बँकचे अर्ज भरून त्यांची परीक्षेसाठी तयारी करून घेतली जाते.तसेच वेगवेगळ्या प्रकारचे प्रक्षिक्षण देऊन मुले मुली स्वावलंबी होतील ह्यावर विशेष लक्ष दिले जाते.धन्यवाद
माई बालभवनडोनेट एड सोसायटी उपक्रम
दिव्यांगास देऊ आपण आधार,नव्या उमेदीने करू त्यांचे स्वप्न साकार!


स्वमग्न / अपंग मुलांना माणूस म्हणून त्यांना आर्थिक सक्षम होण्यासाठी बळ देण्याचे महत्वपूर्ण कार्य दास चे सर्व कार्यकर्ते करत आहेत.......!!

मोखाडा तालुक्यात ९५% लोकसंख्या ही आदिवासी कुटुंबियांची आहे. पाड्यावर किंवा शेतात राहणारे हे बंधू भगिनी अल्पशा उत्पन्नावर कशीबशी गुजराण करतात. तसेही रोजगाराची माध्यमे कमीच आणि त्यात भर पडली ती कोरोनाची. त्यामुळे रोजगाराची स्थिती गंभीर झालेली आहे. अन त्यातल्या त्यात दिव्यांग बंधू भगिनींना तर अतिशय अवघड परिस्थितीचा सामना करावा लागतो.

याच गोष्टीचा विचार करून डोनेट एड सोसायटी च्या माध्यमातून दिव्यांग व इतर आदिवासी बंधू भगिनींना व्यावायिकदृष्ट्या प्रशिक्षण देण्यासाठी त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी, तसेच या संकटकाळात स्थलांतर थांबवण्यासाठी दास चे स्वप्नील डफळ यांचे मित्र सन्मानीय श्री. राहुल पाटील यांनी एक शिलाई मशीन डोनेट एड सोसायटी च्या माध्यमातून देणगी स्वरुपात दिली आहे.

आधार संस्थेच्या कार्यात किशोरी ताई व नितीन सर डोनेट एड सोसायटी कार्यकर्ते यांनी नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे.

आदिवासी बांधवांच्या उपजीविकेसंदर्भात किशोरी ताई सोबत चर्चा करत असतांना त्यांनी शिलाई मशीन चा पर्याय सांगितला. त्यांनी सन्माननीय श्री. राहुल पाटील सर व सन्माननीय श्री. स्वप्नील सर यांच्याशी चर्चा केली असता श्री. राहुल पाटील सरांनी उदार अंतकरणाने या कार्यास हातभार लावण्याची तयारी दर्शवली. या कार्यासाठी सन्माननीय किशोरी ताई व सन्माननीय श्री. नितीन सर यांनी परिश्रम घेतले.

आज दिव्यांग आदिवासी बांधवांसाठी आम्ही शिलाई मशीन च्या माध्यमातून त्यांना कपडे शिवणे, मास्क शिवणे, कापडी पिशव्या शिवणे इत्यादी काम स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देऊ शकत आहोत. या बनलेल्या वस्तूंचे विपणन व विक्री करण्यासाठी आमचे कार्यकर्ते मदत करतील.

तसेच दिव्यांग नसणाऱ्या स्थानिक आदिवासी बंधू भगिनींनाही हे प्रशिक्षण व रोजगाराची संधी याद्वारे देता येईल.

स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देऊन आदिवासी बांधवांचे स्थलांतर थांबवण्यासाठी या उपक्रमास सहकार्य करणाऱ्या सर्व सन्माननीय व्यक्तींचे मी आधार सामाजिक संस्था व स्थानिक बंधू भगिनी यांच्या वतीने मनःपूर्वक आभार!

मुश्कील नही है के दरिया बनकर किसी को बहाये, पर इन्सान वही है जो जरिया बनकर किसी को बचाये!!!

एक जरिया म्हणजे माध्यम बनून डोनेट एड सोसायटी व ग्रुपचे सर्व सदस्य गरजूंच्या गरजा पूर्ण करण्यासाठी व त्यांना स्वावलंबी बनवून त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्नरत आहे करिता मी मिलिंद धनाजी गुडदे आपले व्यक्तीशः व संस्थेच्या वतीने आपले अभिनंदन करतो व आपल्याप्रती ऋण व्यक्त करतो.

संस्थेची माहिती:
आधार सामाजिक संस्था ही एक नोंदणीकृत व ना नफा तत्वावर चालणारी सामाजिक संस्था असून संस्थेचे कार्यालय पुणे व मोखाडा येथे आहे.

मागील चार वर्षापासून आम्ही पुणे व पिंपरी चिंचवड येथे बांधकाम मजुरांच्या बालकांसाठी बांधकाम साईटवर १२ दिवकंठात सशाळा चालवत असून एक महिन्याच्या बाळापासून तर सोळा वर्षांच्या बालकांपर्यंत बांधकाम मजुरांची मुले सकाळी ०९.३० तो सायंकाळी ०६.०० पर्यंत उपस्थित असतात. छोट्या बाळांसाठी पाळणाघर तर मोठ्या बालकांसाठी अनौपचारिक शिक्षणाची सुविधा संस्थेमार्फत केली जाते. याव्यतिरिक्त मध्यान्ह जेवण, आरोग्य, स्वच्छता, उपचार, मनोरंजन, कलाकौशल्य, समुपदेशन इत्यादी सुविधा मोफत दिल्या जातात.

तीन वर्षापूर्वी पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यामधील आदिवासी बांधवांसाठी प्रकल्प सुरु करण्यात आला.

अतिशय दारिद्र्यात जीवन कंठत असलेले व स्थानिक पातळीवर रोजगारा अभावी इतर ठिकाणी मोलमजुरी करण्यासाठी स्थलांतरित होत असलेले आदिवासी बंधुभागीनींच्या विकासात हातभार लावणे हा उद्देश ठेऊन कार्यक्रम आखला गेला.

मोखाड्यामध्ये आतापर्यंत आरोग्य, शिक्षण, उपजीविका व पर्यावरण या विषयावर अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. श्री छत्रपती शिवाजी महाराज शाळेतील बालकांसाठी देणगीदारांच्या मदतीने शौचालय व मुतारी बांधून देण्यात आली.

कोरोनाच्या लाटेत घरात खाण्यास काही नसल्यामुळे उपाशीपोटी झोपणाऱ्या ११५० कुटुंबांसाठी व दिव्यांगासाठी आम्ही मोखाडा येथे महिनाभराचा किराणा व स्वच्छता साहित्य हॅबीटॅट फॉर ह्यूमॅनीटी या देणगीदार संस्थेच्या माध्यमातून मोफत पोचवले.

याव्यतिरिक्त स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून स्थलांतर थांबवण्यासाठी उपजीविका आधारित काही प्रकल्प हॅबीटॅट फॉर ह्यूमॅनीटी कडे प्रस्तावित असून लवकरच सुरु होतील.

असेच अनेक उपक्रम राबवून तिथे अन्न, वस्त्र, निवारा व महत्त्वाचे रोजगार उपलब्ध होतील ह्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.धन्यवाददिव्यांगास देऊ आपण आधार,नव्या उमेदीने करू त्यांचे स्वप्न साकार!

दिव्यांगणाच्या जीवनात आपलं म्हणून आधारची सावट देणारं कोणी असावं,दिव्यांग हे जन्मता निर्बलतेला समोरे जातात. तरी कसला आधार न घेता कसं बसं निराधार आयुष्य व्यतीत करतात.

असे दृश्य आपणास अनेक ठिकाणी बघायला मिळतं पोटासाठी कधी भिक मांगावी लागते रात्रीचा गुजारा करण्यास कधी बसस्टँड शोधावा लागतो अंध,पंगुची ही दिनचर्या अशाप्रकारे कायमची झाली आहे. त्यांच्या आयुष्यात आलेलं दिव्यांगता एकप्रकारे दु:खाचं सावट पसरलं आहे.

त्यासाठी त्यांच्या दैनंदिन जीवनात सुखकर असा मार्ग मिळावा तरतरीतपणा त्यांच्या अंगी यावा म्हणून दृबलतेवर मात करून नव्या उमेदीची क्षितिजे गवसण्यास ते तत्पर होतील, ह्या हेतूने डोनेट एड सोसायटी ने सर्व परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या जीवनात आशेचा किरण जागा व्हावा यासाठी दिव्यांगास देऊ आपण आधार,नव्या उमेदीने करू त्यांचे स्वप्न साकार! ह्या उपक्रमाची संकल्पना मांडून तो राबवण्याचा दृढ ध्यास डोनेट एड सोसायटीच्या सर्व टिमने घेतला आहे.

ह्या उदात्त हेतूने नव्या उमेदीतून नवीन वाटचाल करणे आणि त्यातून घडणाऱ्या सत्कर्माची बिज पेरत जाणे म्हणजेचं आपल्या हातून जे सत्कर्म,माधव सेवा घडते त्यातून आपला आत्मविश्वास एक बिजरूपी विचारांचा भांडार असतो.

त्यात प्रत्येकाने ओंजळभर बिज घेऊन पेरत जाणे आणि एक विशाल वृक्ष त्यातून निर्माण होईल. कोणाला सावली होऊन आधार देईन,कोणाला रसाळ गोमटी फळांचा आस्वाद घेता येईल, यातून मिळणारे समाधान दु:खातून आनंदरूपी होणे हा एक चिंतनात्मक मानबिंदू ठेवून दिव्यांगतेचा कार्यमग्नात विकास होणे त्यातून निर्बल निराधारास प्रेरणा मिळावी व ते स्वकर्तृत्वाने आपली ढासाळलेली आवस्था सुधारणार ह्या उद्देशाने हा डोनेट एड सोसायटीचा उपक्रम आहे.

दिव्यांगास नव्या उमेदीने कार्यमग्नात आणणे, त्यांच्यात सहविष्णूता जागवणे,त्यांचा आत्मविश्वास वाढवणे.हे काम आपण दिव्यांगणाच्या कमजोरीवर मात करणार आणि नव्या उत्साहाने त्यांच्या जीवनाला ते सुखरूप आकार देऊ शकतात. दिव्यांग एक ज्वलंत स्थिती असते ती सावरण्यास निसर्ग किमया मिळते. अनेक अंध,अपंग लोक कलेची जाण राखतात. त्यातून मिळणारी बरकत पोटासाठी असते.

आज अनेक कलावंत अंध,अपंग आहेत.त्यांच्यात जगण्याची उमेद आहे. नवीन काही कार्य घडावे आपल्या हातून त्यातून दिव्यांगास नव्या उमेदीची प्रेरणा मिळावी हा सकारात्मक विचार असल्यावर वाईट परिस्थितीशी खचता खाव्या लागत नाही तर आपण सक्षम वाटचाल करण्यास तत्पर होतो.

दिव्यांगास देऊ आपण आधार,नव्या उमेदीने करू त्यांचे स्वप्न साकार, हा उपक्रम डोनेट एड सोसायटी राबवत आहे. अंध,अपंग,निराधारांसाठी व त्यांच्यातली इच्छाशक्ती बळकट करण्यासाठी हि संकल्पना जरूर डोनेट एड सोसायटीची टिम पुर्ण करणार आणि त्यातून नवप्रेरणेची ज्योत पेटवणार अनेक दिव्यांगास दिपज्वलीत करून त्यांचे स्वप्न साकार होणार, आपल्या कर्तृत्वातून विश्र्वरूप घडत असेल तर आपण हात आवळायचे कशाला,आपल्या हातून परमार्थ कार्य घडत आहे.ह्या आशेने आपण पाठबळ केले पाहिजे.

जीवन मैं दिप जलाओ,अंधियारी में ना ठुकराओ
कर्म का मार्ग चुनों, सत्कर्म करते चलो
विकलांग मैं कर्म जगाओ, भिक से कमजोर ना होने दो
विचार प्रेरणास्रोत बनो, सब मिलकर जोश का गित गाओ
दिव्यांगास सक्षम बनवण्याचा हा एक प्रयत्न डोनेट एड सोसायटीने घेतलेला हा वसा आहे.

लेखन
कवी:- गौतम केदारनाथ जगताप.डोनेट एड सोसायटी दिव्यांग उपक्रम(2020) नंदनवन जुन्नर

डोनेट एड सोसायटी उपक्रम

दिव्यांगास देऊ आपण आधार,नव्या उमेदीने करू त्यांचे स्वप्न साकार!


दिव्यांग कोण असतो??? आपल्यासारखाच एक सामान्य माणूस, पण निसर्गाने त्यांना काही अवयव असे दिलेले असतात की, त्यामुळे ते आपल्या सारखे सामान्य आयुष्य जगू शकत नाही......यात त्यांचा काय दोष ?? याच गोष्टीचा विचार करून डोनेट एड सोसायटी च्या माध्यमातून दिव्यांगाच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी, माणूस म्हणून त्यांना आर्थिक सक्षम होण्यासाठी बळ देण्याचे महत्वपूर्ण कार्य नितीन घोडके सर, किशोरी अग्निहोत्री मॅडम,हिमानी मॅडम,नितीन शेलार व दास चे सर्व कार्यकर्ते करत आहेत.......

दिव्यांग व्यक्तीला सक्षम करण्याच्या याच उपक्रमाच्या माध्यमातून एक माणसातील माणुसकी असलेले कुटुंब

किशोरी ताईंच्या मित्रपरिवारातील अमित व अपर्णा पाटील यांनी त्यांचा लाडका मुलगा आर्यन च्या 7 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिव्यांगासाठी शिलाई मशीन डोनेट एड सोसायटी च्या माध्यमातून देऊ केली होती.

माझे(नितीन शेलार) व किशोरी ताईंचे जुन्नरच्या प्रकल्पासाठी चर्चा झाली. व त्यानंतर सर्व प्रकल्पाचा आढावा व संस्थेची उत्तम कार्य पद्धतीचा विचार करता विकास घोगरे सर यांच्या माय ऍक्टिव्हिटी सेंटर च्या नंदनवन मध्ये बागडणाऱ्या दिव्यांग मुलांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी शिलाई मशीन घेऊन देण्यात आली आहे,

यामुळे त्यांच्या संस्थेच्या मुलांना एक नवी दिशा मिळणार आहे. यातून त्यांना त्यांच्या भविष्यकालीन स्वप्नांना साकार करण्यासाठी नवीन संधी मिळणार आहे.

दिव्यांगास देऊ आपण आधार,नव्या उमेदीने करू त्यांचे स्वप्न साकार! दिव्यांगतेचा कार्यमग्नात विकास होणे त्यातून निर्बल निराधारास प्रेरणा मिळावी व ते स्वकर्तृत्वाने आपली ढासाळलेली आवस्था सुधारणार ह्या उद्देशाने हा डोनेट एड सोसायटीचा उपक्रम आहे.

दिव्यांगास सक्षम बनवण्याचा हा एक प्रयत्न डोनेट एड सोसायटीने घेतलेला हा वसा आहे.

नितीन शेलार,जुन्नर

संस्थेची माहिती:
यशोगाथा

 घे पाखरा मार भरारी
नको पाहू फिरुनी माघारी
जरी अधुरी तुझी कहानी
परी गात जा मंजुळ गाणी.....

 संस्थेचे नाव : माय ऍक्टिव्हिटी सेंटर (दिव्यांग/विशेष बांधवांसाठी)
 नोंदणी क्रमांक : एफ 49617 
संस्थापक : श्री. विकास बाजीराव घोगरे 
संस्था स्थापनेचा दिनांक : 3 ऑक्टोबर 2012 
पत्ता : नंदनवन संस्था, मु. पोस्ट. खानापूर, धामणखेल रोड, ता. जुन्नर, जिल्हा : पुणे. महाराष्ट्र पिन 410502
संपर्क : 
एकूण निवासी विद्यार्थी संख्या : 22 मुले 
लाभार्थी विद्यार्थी संख्या : शंभराहून अधिक 
एकूण कार्यकर्ता संख्या : 6
- 3 विशेष शिक्षक 
- 2 मदतनीस 
- 1 स्वयंपाकी
एकूण वैयक्तिक व संस्था पुरस्कार : 11 

संस्थेचा इतिहास

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेल्या शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी खानापूर या छोट्याशा गावी 2016 पासून दिव्यांग मतिमंद बांधवांसाठी कार्य करत असलेल्या माय ऍक्टिव्हिटी सेंटर ची स्थापना 3 ऑक्टोबर 2012 रोजी झाली. माया नगरी मुंबईत विशेष बालकांसाठी काम सुरु केले परंतु संस्थेची खरी करत ग्रामीण भागात आहे हे ओळखून जुन्नर शहरात एका छोट्याशा भाड्याच्या घरामध्ये दोन मतिमंद मुलांना घेऊन काम सुरू केले. सण 2012च्या सर्वेनुसार अनेक दिव्यांग मतिमंद मुलांशी संपर्क झाल्यानंतर लक्षात आले की बऱ्याच मुलांकडे अपंगत्वाचा दाखलाच नाही म्हणून पालकांच्या घरोघरी जाऊन त्यांना प्रथम मुलांचे दाखले काढून दिले. मुलांना एकत्रित करून त्यांना दैनंदिन कौशल्य शिकवण्यावर भर दिला त्यामुळे मुलांमध्ये हे विशेष बदल घडून आल्याचे पालकांच्या लक्षात आले मग दिवसभर मुलांसाठी शाळा सुरू करण्यात यावी याची मागणी झाली. म्हणून आणखी मोठ्या जागेत मुलांसाठी काम सुरू केले. हे सर्व काम पाहून जुन्नर मधील दानशूर व्यक्तिमत्व सौ. रुपाली बोकरिया यांनी जुन्नर शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर माळरानावर संस्थेला १० गुंठे जागा बक्षीस पत्र म्हणून दिली. एक वर्षानंतर संस्थेच्या स्वतःच्या जागेच्या बाजुलाच असलेल्या कुकूटपालन व्यवसायासाठी असलेले शेड भाड्याने घेऊन त्यामध्ये आणखी दोन मुलांना घेऊन नंदनवन नावाचा निवासी प्रकल्प सुरू केल्यावर अनेक निवासी मुले संस्थेत येऊ लागली. म्हणून व्हाट्सअप वर आवाहन करून अगदी शंभर रुपये देणगी स्वीकारून एक पत्र्याचे शेड उभे केले. त्यात कार्यालय व स्वयंपाकगृह स्वतंत्र बनवण्यात आले त्यामुळे निवासी मुलांना व्यवस्थित राहण्याची व शिक्षणाची सोय उपलब्ध झाली. संस्थेत आता सध्या 22 मतिमंद बांधव आहेत कामाची चिकाटी प्रामाणिकपणा व संस्थेला असलेल्या अडचणीमुळे लायन्स क्लब शिवनेरी नारायणगाव यांनी चौदाशे स्के. फूट बांधकाम हाती घेतले आहे. संस्थेच्या माध्यमातून पुढील उपक्रम सुरू आहेत

- शीघ्र हस्तक्षेप कार्यक्रम

या उपक्रमांतर्गत 0 ते 6 वयोगटातील दिव्यांग मुलांना आवश्यकतेनुसार विविध थेरोपी दिल्या जातात. यासाठी मुंबई-पुण्याहून काही तज्ञ व्यक्ती येऊन मार्गदर्शन करतात. - फुलपाखरू शैक्षणिक उपक्रम या उपक्रमांतर्गत जुन्नर शहर व आदिवासी भागातील 6 ते 18 वयोगटातील एकूण 14 मतिमंद विद्यार्थी शैक्षणिक लाभ घेत आहेत. यामध्ये विशेष शिक्षकांच्या माध्यमातून मुलांच्या वाचन-लेखन अंकगणित यावर विशेष भर दिला जातो. स्वावलंबन व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र

मतिमंद व दिव्यांग बांधवांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये अगरबत्ती, कापडी फुले, दिवे, मेणबत्ती बनविणे अशा विविध वस्तू बनवून घेऊन प्रदर्शना मार्फत त्यांची विक्री केली जाते. यातून होणारे उत्पन्न आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या मुलांच्या खात्यावर जमा केले जाते. नंदनवन वस्तीगृह

या प्रकल्पाद्वारे 18 वर्षांपुढील मतिमंद बांधवांना राहण्याची मोफत सुविधा उपलब्ध आहे. तसेच मतिमंद मुलांच्या पुनर्वसनासाठी कार्य केले जाते. यामध्ये त्यांना निवास भोजन, वैद्यकीय सुविधा या सारख्या गरजा पुरविला जातात. मतिमंद मुलांच्या व्यक्तिमत्व विकासावर भर दिला जातो. त्यांना अंघोळ करणे, कपडे घालने, सिंगार करणे अशी अशी कौशल्य वैयक्तिक रित्या करवून घेतली जातात. स्वतःचे काम स्वतः करणे ही आपली वैयक्तिक जबाबदारी आहे म्हणून प्रकल्पामध्ये मुलांबाबत कडून प्रत्यक्ष काम करून घेतले जाते. रंग माझा वेगळा ऑर्केस्ट्रा

या उपक्रमाद्वारे अभिनय नृत्य गायन क्षेत्रात विशेष रुची असणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना संस्कृती शोध व्यावसायिक कलाकार म्हणून मान्यता मिळवून देणे तसेच या कलाकार बांधवांना सांगती कार्यक्रम उभा करण्यास हातभार लावून स्वतःचे हक्काचे सांस्कृतिक व्यासपीठ उभे करून देण्यासाठी हा प्रकल्प प्रयत्नशील आहे. या प्रकल्पाद्वारे अपंग बांधवांना नुसत्या संगीत यांचे तज्ञांकडून मार्गदर्शन प्रशिक्षण दिले जाते. याच प्रयत्नातून रंग माझा वेगळा हा मराठी गाण्यांचा वाद्यवृंद आकाराला आला आहे. संस्थेतील काही दिव्यांग कलाकारांनी विविध चॅनेलवर आपली कला सादर केली आहे. बळीराजा शेती प्रकल्प भारत हा कृषिप्रधान देश असून शेतकरी हा त्याचा कणा आहे. तो सक्षम होण्याच्या दृष्टीने अठरा वर्षापुढील मतिमंद बांधवांना शेतीविषयक ज्ञान देऊन त्यांच्याकडून नैसर्गिक शेती करून घेतली जाते. इतर शिक्षकांसाठी पालकांसाठी विद्यार्थ्यांसाठी विविध शिबिराचे आयोजन विविध ठिकाणी जनजागृती कार्यक्रमाचे सादरीकरण अनेक मेडिकल आयोजन विविध ठिकाणी दिव्यांग कलाकारांनी सादर केलेला रंग माझा वेगळा ऑर्केस्ट्राचे आयोजन सादरीकरण

धन्यवाद
श्री विकास घोगरेडोनेट एड सोसायटी दिव्यांगांसाठी उपक्रम(2020) आरंभ औरंगाबाद

डोनेट एड सोसायटी उपक्रम

दिव्यांगास देऊ आपण आधार,नव्या उमेदीने करू त्यांचे स्वप्न साकार!
स्वमग्न / अपंग मुलांना माणूस म्हणून त्यांना आर्थिक सक्षम होण्यासाठी बळ देण्याचे महत्वपूर्ण कार्य दास चे सर्व कार्यकर्ते करत आहेत.......!!

स्वमग्नता म्हणजेच स्वतःच्या विश्वात रममाण असणे. बाहेरच्या जगाशी काही देणेघेणे नसते, पण ही मुल मतिमंद नसतात. त्यांच्या क्षमता विकसित करून त्यांना नवीन नव्या क्षितिजाकडे मार्गक्रमन करावी लागते.

याच गोष्टीचा विचार करून डोनेट एड सोसायटी च्या माध्यमातून स्वमग्न मुलांना व्यावायिकदृष्ट्या प्रशिक्षण देण्यासाठी त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी, तसेच इको फ्रेंडली जूट च्या कापडाच्या पिशव्या बनवण्यासाठी.

किशोरी ताईंच्या मित्रपरिवारातील तृप्ती व वरून पुट्टेवार यांची कन्या ॠचा वरूण पुट्टेवार हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिलाई मशीन डोनेट एड सोसायटी च्या माध्यमातून देऊ केली.

माझे किशोरी ताईंचे आरंभ साठीच्या ह्या नवीन प्रकल्पासाठी चर्चा झाली. त्यानंतर सर्व संस्थेची पूर्ण माहिती पाठवली. त्यांच्या निकषानुसार त्यांनी आरंभला आणि पर्यायाने स्वमग्न मुलांसाठी शिलाई मशीन देण्यात आली.

यामुळे संस्थेच्या मुलांना नवीन गोष्ट शिकण्यास मिळणार आहे तसेच ह्यातून जुट च्या पिशव्या तयार करून त्याची विक्री करण्यात येणार आहे त्यासाठी हे खूप मोलाचे ठरेल.

स्वमग्न मुलांना सक्षम बनवण्याचा हा एक प्रयत्न डोनेट एड सोसायटीने घेतलेला हा नवीन प्रोजेक्ट खूपच स्तुत्य आहे.

मी अंबिका टाकळकर आरंभ तसेच सर्व मुलांतर्फे दासचे आणि तृप्ती व वरून पुट्टेवर ह्यांचे आभार मानते तसेच कु.ऋचा हीच वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !

यशोगाथा
स्वमग्न जरी मी असे 
मतीमंद परी मी नसे 
जरी एक तुमच्यातला
परी विश्व माझे वेगळे 

संस्थेचे नाव : आरंभ स्वमग्न व गतीमंद मुलांची संस्था, औरंगाबाद
नोंदणी क्रमांक : एफ 18307 
संस्थापक : सौ. अंबिका टाकळकर 
संस्था स्थापनेचा दिनांक : 4 नोव्हेंबर 2011
पत्ता : 
संपर्क : प्लॉट नं 2, मेडिकल हाउसिंग सोसायटी, दर्गा चोक, औरंगाबाद. 431005
लाभार्थी विद्यार्थी संख्या : 67
एकूण कार्यकर्ता संख्या : 18
- 5 विशेष शिक्षक 
- 4 थेरपिस्ट 
- 3 सहायक टीचर 
- 2 मदतनीस 
- 2 ड्रायव्हर
- 1 अकाउं ट 
- 1 ऑफिस असिस्टंट 

एकूण वैयक्तिक व संस्था पुरस्कार : 40
संस्थेचा इतिहास

आमच्या मराठवाड्यात स्वमग्न मुलांसाठी काहीही प्रकल्प नाहीत, हे लक्षात आल्यावर, आपल्या सारख्याच आपल्या पाल्यासाठी धडपडणाऱ्या दुसऱ्या आयांना आपल्या मुलाच्या उपचारासाठी वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला लागू नये, त्यांना एकाच ठिकाणी सगळ्या सोयी सुविधा आणि उपचार पद्धती उपलब्ध व्हाव्या म्हणून श्रीहरी च्या आईने आरंभची स्थापना केली.

असणाऱ्या छोट्या छोट्या मुलांसाठी आरंभ थेरेपी सेंटर चालवले जाते. जिथे जरुरी असलेल्या सगळ्या थेरपी हसत खेळत येथे दादा, ताई करून घेतात.

भाषा, संवाद साधण्याचे माध्यम. हेच भाशाकौशल्य अतिशय कल्पकतेने मला शिकवलं जात. अनेक स्वमग्न मुल नॉन व्हरबल असतो. भाषा यायलाच हवी पण ती आली नाही तरी संवाद कसा करायचा हे शिकवलं जाते.

आरंभ मधून शिक्षित झालेल्या मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा, तसेच त्यांना उपजीविकेचे साधन कलेद्वारे प्राप्त व्हावे म्हणून , आरंभ तर्फे १८ वर्षांवरीl मुलांनी केलेल्या विवध कलाकुसरीच्या वस्तू विविध प्रदर्शनात मांडण्यात येतात. तसेच विविध कार्यालये, औद्योगिक संस्थापनांकडून विविध वस्तू जसे ग्रीटिंग कार्ड्स, पणत्या,कागदी पिशव्या ह्यांना मागणी असते. ह्या वस्तूंची विक्री करून आलेला नफा मुलांना वेतन स्वरुपात चेकद्वारे दिला जातो. तेंव्हा तर आनंद तर होतोच पण त्यासोबत आईबाबांच्या चेहरा अभिमानाने भरून येतो....

आरंभ मध्ये फक्त मुलांसाठी नाही तर पालकांसाठी पण "प्रारंभ" नावाचा : पालक- शिक्षक प्रशिक्षण राबवला जातो. आरंभ तर्फे स्वमग्न , गतिमंद , आणि इतर विशेष मुलांच्या पालकांना तसेच विशेष शिक्षणात कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण वर्ग चालवल्या जातात. एक व दोन दिवसाचे असे लघु तसेच तीन महिन्याचा “स्वमग्नता जाणून घेताना” हा दीर्घ प्रशिक्षण चालवले जाते.

मुलांच्या कलागुणांना विकसित करण्यासाठी दर शनिवारी आरंभ फन क्लब : चालवला जातो. स्वमग्न मुलांना समाजात त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व ते एखाद्या गोष्टीती पारंगत व्हावेत म्हणून तसेच त्यांच्या पालकांना मनोरंजन व्हावे म्हणून नृत्य, गायन, चित्रकाम, रंगकाम , तबला आणि इतर वाद्य वादन ह्याचे प्रशिक्षण देण्यात येते आणि त्याचे कार्यक्रम आयोजित केल्या जातात.

संगणक प्रशिक्षण केंद्र: दिले जाते. त्याचप्रमाणे आरंभ ग्रंथालय: पालक समुपदेशन : प्रशिक्षण कार्यशाळा : आरंभ स्वमग्नता पालक मंच : आरंभ तर्फे, स्वमग्न आणि गतिमंद असणाऱ्या मुलांच्या मदतीसाठी , अडचणीत सोबत देण्यासाठी पालक मंच चालवण्यात येतो. ज्यात पालक एकत्र येवून मुलांसाठी विविध उपक्रम राबवले जाते.

माझ्या सगळ्या छोट्या मित्र मैत्रीणीना शिकण्यासाठी, त्यांच्या थेरपी साठी गरज आहे ती तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची. आम्हाला सहानुभूती नकोय तर हवय सहकार्य आणि सह अनुभूती.... !!

अंबिका टाकळकर
संचालिका
आरंभ स्वमग्न व गतीमंद मुलांची संस्था, औरंगाबाद