डोनेट एड सोसायटी महिना 100 रुपये सेवानिधी तुन मदत

आपुलकी जपता, मायेची उब देणारा आधार उपक्रम

  

 आपुलकीचा एक आधार
 प्रत्येकात जिव्हाळा निर्माण करेल
 आधाराची कडी निसटल्यावर
 दास तिथे मायेची उब मिळेल

गडचिरोली जिल्ह्यातील अतीदुर्गम भागातील आदिवासी बांधवांना डोनेट एड सोसायटी पुणे महिना 100 रुपये ग्रुप यांच्या माध्यमातून स्वेटर वाटप

तळागाळातील लोकांना आजही जगणे असह्य झाले आहे. वर्षभर वारा-पाऊस सहन करत आपल्या झोपडीत रात्रभर जागरण हे जणू नित्याचेच असते.

एकवेळचे जेवण मिळण्यासाठी दिवसभर कष्ट करणाऱ्या गरिबांना मुलभूत गोष्टी नेहमीच मिळाल्या नाही आहेत.

त्याचप्रमाणे गडचिरोली- जिल्ह्यात अहेरी आदिवासी भागातील गरीब लोकांना पाहिजे त्या गोष्टी मिळू शकत नाहीत.आता सध्या सगळीकडे हिवाळा सुरु झाला आहे तरी हिवाळ्यात लागणाऱ्या गरजेच्या गोष्टी त्या गरीब-गरजू लोकांना त्या घेता येत नाहीत.

डोनेट एड सोसायटीची सर्व टिम व डोनेट एड सोसायटी महिना 100 रुपये सेवानिधी तून उदात्त हेतूने

दुर्गम भागातील लहान मुलांना आवश्यकतेनुसार उबदार कपड्यांची उनिव भासते परिस्थितीनुसार, असुविधा तिथे विकास प्रगतिच्या,पायवाटा खुंटते आणि गैरसोयी मिर्माण होते आणि लहान मुलांनाच्या चेहेऱ्यावर नैराश्यता बघण्यास ती आनंदात बदलण्या प्रयत्न डोनेट एड सोसायटी करत आहे.

याच विचारातून डोनेट एड सोसायटी पुणें च्या माध्यमातून व तेथील तळागाळातील लोकांसाठी जीव ओतून कार्य करणारा सुदीप सर यांच्या माध्यमातून हा उपक्रम दुर्गम भागातील गावातील लोकांसोबत साजरा केले

सुदीप सरांना मनापासून धन्यवाद आज तुमच्या सारख्या सेवा देणाऱ्या लोकांमुळे आम्ही एवढ्या दुर्गम भागात मदत पोहचवू शकलो व मुलांना झालेला आनंद व त्यांना मायेची ऊब देण्यासाठी छोटासा प्रयत्न तुमच्या सेवेमुळे बघू व अनुभवू शकलो.

धन्यवाद
डोनेट एड सोसायटीडोनेट एड सोसायटी महिना 100 रुपये सेवानिधी उपक्रमातुन

माई बालभवन

माई बालभवन ही केवळ एक संस्था नसून ते एक घरकुल आहे. अनाथ ,अंध, मूकबधीर, दिव्यांग त्याशिवाय एच आय व्ही पॉसिटिव अशा अनेक प्रकारच्या निराधार मुलींसाठी एक भक्कम आधार देणारे हे घरकुल आहे. २००६ मध्ये चालू झालेली ही संस्था खऱ्या अर्थाने आकाराला आली २००७-८ या वर्षी. बघता बघता हिचा विस्तार वाढतच गेला. या मुलींचे शिक्षण आरोग्य व त्यांचे पुनर्वसन या तीन गोष्टींवर प्रामुख्याने भर देऊन त्यांचे आपुलकीने संगोपन केले जाते. योग्य व अनुकूल होतकरु तरुणाबरोबर लग्नही लावून दिले जाते. असे ३० विवाह आजवर यशस्वी झाले आहेत.

या मुलींच्या आरोग्यासाठी योगा व प्राणायामवर्ग ही घेतले जातात. तसच या मुलींना शिवणकाम, बास्केट विणणे अशा कलाही शिकवल्या जातात. संगणक प्रशिक्षण ही दिले जाते, बँकेच्या नोकरीसाठी त्यांची व्यवस्थित तयारी करुन घेतली जाते. त्यासाठी वाचक व लेखनिक यांचीही व्यवास्था करण्यात येते. ह्या मुलींना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी माईंची अविरत धडपड चालू असते.

सध्याची बालभवनची जागा ही अर्थातच भाड्याची आहे. ती खाली करण्यासंबंधी नोटीस आलेली आहे. त्यामुळे माई बालभवन नविन व जमलं तर स्वःच्या जागेत नव्याने वसण्यासाठी उत्सुक आहे. अर्थात हे समाजातील देणगीदार व मदतगारांच्या मदतीवरच शक्य होणार आहे..

या कोविड च्या परिस्थितीत संस्थेला सहज म्हणून भेट देणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. महिन्याच्या रेशन व्यतिरिक्त ही काही मदत गोळा होत असे तिचेही प्रमाण घटले आहे. इथल्या काही मुलींना रक्तातील हिमोग्लोबिन कमी होणे ही समस्या पण भेडसावत आहे. त्यासाठी काही औषधे व विशेष पदार्थांची पण गरज आहेच. संस्थेकडून आवाहन केले जात आहेच.

पण अशा बिकट *सेवादीप व डोनेट एड सोसायटी ह्या समाजसेवी संस्था भक्कम पाठिंबा देत आहेत.* महिना 100 रुपये ग्रुप तर्फे देखील अनेक वेळा मदत केली आहे,नुकताच या महिन्याचा आवश्यक किराणा बालभवनला देण्याची व्यवास्था करण्यात आली. स्वप्नील डफळ यांचे मित्र दास चे *राहुल पाटील सर* यांनी किराण्याची व्यवस्था केली. किशोरी अग्निहोत्री, नितीन घोडके सर यांच्या मार्गदर्शनानुसार सामान जमा करुन ते रोहित शेणॉय यांनी स्वतः नेऊन दिले.

माई बालभवन सारख्या अनेक संस्था आज समाजात कार्यरत आहेत. त्यांना व समाजातील देणगीदारांना जोडून मदतीचा सेतू उभे करण्याचे कार्य सेवादिप व डोनेट एड सोसायटी करत आहे .

धन्यवाद
लेखन
सौ.प्रिया जोगडोनेट एड सोसायटी महिना 100 रुपये सेवनिधी उपक्रमातून मदतीचा हात

पंखांना देऊ बळ

विशाल विष्णू बंडगर हा यंदा दहावीच्या परीक्षेला बसलेला आहे. परळी वैजनाथ बीड येथील ऊस तोडणी कामगाराचा हा धाकटा मुलगा. आईवडील दोघेही ऊसतोडणीसाठी दिवसभर बाहेर.त्यामुळे अर्थातच घरी मुलांकडे लक्ष देणं शक्य नाहीच. यामुळेच मोठा भाऊ तर विना शिक्षण वायाच गेला. गावातील विश्व हिंदू परीषदेचं कार्य करणाऱ्या एका कार्यकर्त्याच्या ध्यानात ही विशालची परिस्थिती आली. त्यावेळी विशाल असेल अवघा साडेपाच सहा वर्षांचा. विशालकडे जर वेळीच लक्ष दिलं नाही तर तो ही हाताबाहेर जाईल हे जाणून त्या कार्यकर्त्याने प्रयत्न चालू केले. पुण्याला देहू येथील संत श्री. गाडगेबाबा आश्रम शाळेत त्याला ठेवायचे ठरले.

पुण्याच्या कार्यकर्त्याने या कार्याची पुढची कडी जोडली. विशालचे पालकत्व स्वीकारले. विशालच्या आयुष्याचे एक नवे पर्व सुरु झाले. इयत्ता १ ते ४ या प्राथमिक शिक्षणा दरम्यान शाळेच्या असं लक्षात आलं की या मुलाचे अभ्यासात विशेष लक्ष नाही. खेळणे व दांडगाई करणे यातच सारे लक्ष आहे. अर्थात त्याला तिथे तशी संगत लाभली होती. पुन्हा पालकत्व स्वीकारलेले कार्यकर्ते व आश्रम शाळेचे मुख्य आणि देहूचे सरपंच यांची एक बैठक झाली. विशालला जर खरच चांगले वळण लावायचे असेल तर शाळा चांगली हवी. हे सर्वानुमते ठरले. त्याप्रमाणे निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी शाळेचा प्रस्ताव आला. श्री. वा.ना.अभ्यंकर यांना भेटून सारी परिस्थिती सांगितली. तिथल्या गुरुकुलम् ला विशालला ठेवायचे असे ठरले. फक्त आता प्रश्न होता फी चा. वार्षिक फी ९०,००० रुपये होती. शाळेतर्फे दहा ते पंधरा हजाराची सोय होणार होती. बाकी रक्कम देणगी स्वरुपात गोळा करुन भरायचे असा प्रस्ताव मंजूर झाला.

विशाल आता ज्ञान प्रबोधिनी गुरुकुलला दाखल झाला. इथल्या आदर्श संस्कारित वातावरणाचा त्याच्यावर खूप चांगला परिणाम झाला. गुरुकुलमच्या शिक्षणातून त्याला आपला भारत देश म्हणजे काय हे कळले. देशाप्रती कार्य करण्याची ओढ लागली. त्यातूनच आता त्याने सैन्यात भरती होण्याचा निश्चय केला आहे. आज आपला देश सीमेवर सतत शत्रुला तोंड देत आहे. सीमेवर भारतीय जवान प्राणांची बाजी लावून रक्षण करत आहेत म्हणून आपण सुखाने इथे जगत आहोत. सैन्य दलातील भरतीसाठी खूप औदासिन्य आहे. अशा परिस्थितीत विशाल सैन्यात भरती होण्याची मनिषा बाळगून आहे हे विशेष. त्याच्यासाठी धडपड करणारे कार्यकर्ते व त्याचे पालकत्व घेतलेले सद्गृहस्थ [हे ही विश्व हिंदू परिषद व संघ कार्यकर्तेच आहेत] आणि त्यांच्या धडपडीला पाठिंबा देणारी शाळा या सर्वांचाच मोलाचा वाटा आहे.

यंदा विशालने दहावीची परीक्षा दिली आहे. यंदाची फी भरणे बाकी होते तरीही शाळेने पालकांच्या विनंतीचा मान ठेऊन त्याला परिक्षेला बसू दिलं हे ही विशेष. नुकतीच देणगी गोळा करुन ४५,००० फी भरुन झाली. आज आपल्या समाजात विविध कारणांसाठी देणगी देणारे सन्माननीय देणगीदार असतात. त्यातील काही गरजू विद्यार्थ्याला शिक्षणासाठी आवर्जून मदत करणारे असतात. समाजातील प्रत्येक घटक हा एकमेकांच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदतीवर अवलंबून असतोच.

यापुढेही विशालला भावी शिक्षणासाठी आर्थिक मदतीची गरज भागणार आहेच. डोनेट ऐड सोसायटी 100 रुपये ग्रुप तर्फे त्याला मदतीचा हात दिलेला आहेच व यापुढेही दिला जाईल.

देशासाठी कार्य करु पाहण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या विशालला आकाशात भरारी मारण्यासाठी हवे पंखात बळ! चला तर मग आपण देऊ याच्या पंखांना बळ !

धन्यवाद
आर्थिक मदतीसाठी
संपर्क
रोहित शेणॉय
9881318725

लेखन
सौ.प्रिया जोग
२५.६.२०२०डोनेट एड सोसायटी १०० रु. प्रती महिना सेवनिधी योजना

विनम्र आवाहन
प्रिय सन्मानीय ग्रुप सदस्य,

फोडीले भांडार
धन्याचा हा माल
मी तो हमाल
भारवाही

जे जे काही माझ्या हातून सत्कार्य घडत आहे.ते घडवून घेण्याच्या प्रवासात मी फक्त एक हमालच.दुसऱ्याचे दुःख हसतमुखाने आपल्या पाठीवरून वाहणारे आपण सारे भारावहीच आहोत की नाही!
या समाजाचे दुःख जर आपल्याला हळू हळू कमी करायचे असेल तर लाखो हातांनी पुढे येऊन सेवादूत म्हणून काम करण्याची गरजेचे आहे.
यासाठी आपण फक्त ५ जणांना या गटात सामील करून सेवादूताचे कार्य करू शकता

समाजातील गरजूंपर्यंत वस्तू स्वरूपात कार्य पोहोचविण्याचे काम हे डोनेट ऐड सोसायटी च्या माध्यमातून होत आहे. त्यासोबत लहान स्वरूपाच्या मदतीकरिता आपण १०० ₹ प्रतिमहा या व्हाट्सअप्प गटाची स्थापनाही केली परंतु प्रश्नांचे स्वरूप पाहता आपल्याला हे कार्य मोठ्या स्वरूपात करणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला केवळ खालील कामे करावे लागतील

 • आपल्या मित्रमंडळींना सदर उपक्रमाची माहिती
 • कमीत कमी ५ व्यक्तींना या गटात समाविष्ट करणे
 • आपण ऍड केलेली व्यक्ती हसतमुखाने दरमहा १००₹ ट्रान्सफर करतील याची जबाबदारी/फॉल अप/काळजी घेणे
 • गटात समाविष्ट केलेल्या सन्मानीय सदस्यांना आणखी सदस्यांना समाविष्ट करण्यासाठी विनंतीपूर्वक आवाहन करणे.
 • गटातील स्वीकृत सदस्य म्हणून आपण स्वतः दर महिन्याच्या १० तारखेपर्यंत १०० ₹ ट्रान्सफर करून त्याचे स्क्रीन शॉट नावसाहित पाठवावे. जेणेकरून माहिती संकलनास मदत होईल आणि शिवाय आठवण आणि प्रोत्साहन म्हणून इतर सदस्यही मदतकार्यास पुढे सरसावतील

Kindly transfer Rs.100/- only to 

Donate Aid Society
ICICI Bank
*Account no. 337001000216*
*IFSC code: ICIC0003370*
Branch: jogesh wari Temple, Pune

 * And plz share your full name along with screenshot of Transaction. 
 
धन्यवाद
डोनेट-एड-सोसायटीडोनेट_एड_सोसायटीच्या_कार्यकर्त्यांनी_प्रतिसा_देत_महिना_१००_रुपये_सेवा_निधीतून_मदत


डोनेट एड सोसायटी उपक्रम
लक्ष्य तो हर हाल में पाना है

डोनेट एड सोसायटी
दिन दुबळ्यास बनवते सक्षम
मदतीस सदैव तत्पर असते
दास बनुनी होते सेवा धाम    

कोणी हतबल होते,
त्यासी दास मजबूत बनवते
जगण्यास बळ देऊन साह्य दास करते

 
जन संघर्ष समिती, नागपूर गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम आश्या भामरागड, एटापल्ली, सिरोंचा या नक्षलग्रस्त भागात काम करणारी संघटना जन संघर्ष समिती.

नागपूर मागील 5 वर्षांपासून येथे कार्य करीत आहे याभागात आरोग्य , शिक्षण आणि विकास या तीन गोष्टी साठी कार्य सुरू आहे.

अहेरी तालुक्यातील राजाराम खांदला हे गाव अहेरी ते सिरोंचा रोड पासून 5 km आताच्या भागाला आहे संपूर्ण आदिवासी बांधव येथील मुले पोलिस भरती करीता तयारी करीत आहे परंतु त्यांच्या कडे जोडे नसल्यामुळे तयांना अडचण होते ते तसेंच अनवाणी पायांनी सराव करीत होते,

अश्या मुलांना पोलिस भर्ती मध्ये जाता यावे म्हणून जोडे , टी शर्ट , पॅन्ट ची गरज आहे आपण आश्या 55 मुलांना आश्या प्रकारची मदतीसाठी डोनेट एड सोसायटी यांच्या कडे मदतीचे आवाहन केले होते.

लगेच डोनेट एड सोसायटीच्या कार्यकर्त्यांनी प्रतिसाद देत महिना १०० रुपये सेवा निधीतून मदत देऊ केली

आज दिनांक 10 आक्टोम्बर 2020 रोजी गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील राजाराम खांदला या पोलीस मदत केंद्र येथे पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण घेणाऱ्या 60 मुला मुलींना डोनेट ऍड सोसायटी च्या वतीने जोडे व जन संघर्ष समिती च्या वतीने टी शर्ट व लोवर चे वाटप करण्यात आले

ही सर्व मुले अति दुर्गम अश्या नक्षलग्रस्त भागातील आहे ते पोलीस भरतो मध्ये नोकरी मिळावी यासाठी प्रयत्न करीत असतात परंतु तयांच्या कडे पायात साधी चप्पल पण नाही ही बाब जन संघर्ष समिती च्या निर्दशनात आली. आणि तयांनी समाजातील लोकांना एक हात मदती साठी आवाहन केले यात पुणे येथील संस्था डोनेट ऍड सोसायटी यांनी जोडे ची मदत केली त्या मुळे ते आता योग्य प्रकारे सराव करू शकतील

आजच्या या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उप विभागीय अधिकारी श्री बजरंग देसाई , जन संघर्ष समिती चे दत्ता शिर्के , रितेश बाडवाईक, डॉ श्रुती आष्टांनकर , जगदिश वानोडे , महेश ढोबळे , पोलीस केंद्र राजाराम चे प्रभारी श्री भोरे साहेब , श्री पवार साहेब , श्री माने साहेब , श्री गायकवाड साहेब उपस्तीत होते या सर्वांच्या होते वस्तू चे वाटप करण्यात आले.

ही मिळालेली मदतीमूळे आशेचा किरण जागला आहे , व आपल्यासाठी कोणीतरी धडपड करत आहेत व ह्या मिळालेल्या मदतीमधून त्यांच्या कष्टाने व जिद्दीने सोने करतील ही विश्वास आज वाटप करतांना त्यांच्या डोळ्यात दिसला.

हिम्मत से जो कोई चले धरती हिले क़दमों तले
क्या दूरियाँ क्या फ़ासले मंज़िल लगे आके गले
हिम्मत से जो कोई चले धरती हिले क़दमों तले
तू चल यूं ही अब सुबह-ओ-शाम, रुकना, झुकना नहीं तेरा काम
पायेगा जो लक्ष्य है तेरा
लक्ष्य तो हर हाल में पाना हैडोनेट-एड-सोसायटी १०० रुपये डोनेशन ग्रुपने जपला 'माणुसकीधर्म'. 'समाजऋणातुन' उतराई होण्याचा केला छोटा प्रयत्न.


काही दिवसांपूर्वीची घटना.वाघोली येथील रोहिणी संजय पाटोळे (वय-४०वर्षे), मुलगा स्वप्निल संजय पाटोळे(वय-१३वर्षे) याला घेऊन कपडे धुवायला गेल्या होत्या. दुर्दैवाने खेळताना तलावाच्या काठावरुन मुलगा पाण्यात पडला.मुलाला वाचवताना मुलासह आईही पाण्यात बुडाली.या दोघांना बुडताना वाचवण्यासाठी गेलेला तरुण दत्तात्रदय जाधव(वय-३८ वर्षे)अशा तिघांचा या दुर्दैवी घटनेत मृत्यू झाला होता.

घटनेतील पाटोळे कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे.सध्या घरात आजारी असलेले पती व दोन मुली असा परिवार आहे.

मोठी मुलगी स्विटी(वय-१७ वर्षे)हि ११वी कला शाखेत शिक्षण घेत असून छोटी मुलगी साक्षी(वय-१५वर्षे)हि इयत्ता ९वीत आहे.

मुली सध्या वाघोलीतील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या हायस्कूल व महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.

या परिवाराला कोणताही आधार नसल्याने आर्थिक मदतीची अत्यंत गरज होती.घटनेनंतर काही दिवसांनी या परिवाराला मदत मिळावी या सामाजिक हेतूने मी आपल्या डोनेट-एड-सोसायटी ग्रुपवर एक पोस्ट केली होती. आज आपल्या डोनेट-एड-सोसायटी परिवाराचे नितीनदादा व किशोरीताई हे दोघेही स्वताहा वाघोली येथे आले.

आल्यानंतर आम्ही सर्व जण,गावातील काही कार्यकर्ते पाटोळे कुटुंबाच्या घरी गेलो.नितीनदादा व किशोरीताईने मुलींची व कुटुंबातील इतर सदस्यांशी घटनेबाबत चर्चा करुन विचारपूस केली.मुलींना पुढील शिक्षणासाठी मदतीचा धीर दिला.सोबतच १००डोनेशन ग्रुपच्यावतीने या कुटुंबाला महिनाभर पुरेल इतके किराणा सामान देण्यात आले.

यात साखर,तांदूळ,तेल,गहू,डाळी,बेसनपीठ,पोहे,रवा,शेंगदाणे,तूप,कपड्याचे साबन,अंघोळीसाठी साबन,बिस्कीट आदी गृहोपयोगी वस्तूचा समावेश होता.

घटनेनंतर विचारपूस करायला असे अचानक बाहेरील कोणीतरी आल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आधार निर्माण झाला होता. जाताना मुलींच्या शिक्षणासाठी व किरकोळ घर खर्चासाठी ३०००/-चा धनादेश देण्यात आला.मदत फार मोठी नसली तर या मदतीने हे कुटुंब भारावले.मागील जन्मीचं राहिलेले थोडसं 'समाजऋण' फेडून व यापुढेही मदतीचे आश्वासन देऊन आम्ही तात्पुरता निरोप घेऊन पुढच्या 'समाजऋण' मुक्तीच्या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी मार्गस्थ झालो.

गणेश सातव
डोनेट-एड-सोसायटी.डोनेट एड सोसायटी १०० रुपये सेवानिधी उपक्रम

सामाजिक अन्नदान उपक्रम

जीवन संवर्धन फाऊंडेशनचे कार्य

मी पण शिकणारच

मुंबईतील फूटपाथ व प्ल्याटफॉर्म वरील(बेघर) मुले. मूलांना ज्या वेळेस स्वताःचे घर नसते त्या वेळेस समाजातील अराजक तत्व त्याचा गैर फायदा घ्यायला लागतात व् मुलही त्या वयात चांगले काय आणि वाईट काय हे समजण्याच्या स्थितीत नसते.परिणामी ज्या वयात मुलांनी शिक्षण घेतले पाहिजे,खेळले पाहिजे त्या वयात मात्र ही बेघर असलेली मूले समाजाच्या आराजकवादी तत्वांच्या आहारी जातात.या मुलांना दोनवेळच्या जेवणासाठी खूप कसरत करावी लागत असते त्यामुळे ही मुले चोऱ्या करने,पाकिट मारने,किंवा भीक मागणे अश्या कामात ओढली जातात व आलेल्या पैश्यानमधुन नशाही करायला लागतात त्यानंतर मात्र या मुलांचे जीवनच उध्वस्त होत असते.फूटपाथ किंवा प्लायटफ़ॉर्म वर रहात असताना या मुलांचे/मुलींचे जवळ जवळ 100% लैगिक शोषणही होत असते.

गेल्या काही वर्ष्यान पासून जीवन संवर्धन फाऊंडेशनने मुंबईतील फूटपाथ व प्ल्याटफॉर्म वरील(बेघर) मुलांसाठी काम सुरु केलेले आहे

या मुलांचे सर्वेक्षण करने , काहिकाळ मुलाचे निरीक्षण करणे, त्याच्याशी मैत्री करने, त्याला बाहेरच्या जगातील चांगल्या गोष्टींची जाणीव करुन देणे , त्याला शिक्षण घेण्यासाठी तयार करणे व तो शिक्षणासाठी तयार झाला की त्याला योग्य ठिकाणी शिक्षणासाठी ठेऊन त्याला चांगला माणूस बनण्यास मदत करणे

" मी पण शिकणारच " या प्रकल्पातून अनेक मुलांचे आयुष्य उभे राहत आहेे. आतपर्यन्त संस्थेने मुंबईतील 171 मुलांच्या शैक्षणिक पुनर्वसनाचे कार्य केलेले आहे .संस्थेचे सेवा प्रकल्प खालील प्रमाणे-

 • गुरुकुल म्हस्कळ-टिटवाळा
 • मातृछाया गुरुकुल वाग्बीळ-ठाणे

या ठिकाणी मुले मूलिंना या उपक्रमाअंतर्गत शिक्षण दिले जात आहे व त्यांना मायेचा निवारा मिळत आहे

या कोविड च्या परिस्थितीत संस्थेला सहज म्हणून भेट देणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. महिन्याच्या रेशन व्यतिरिक्त ही काही मदत गोळा होत असे तिचेही प्रमाण घटले आहे.

पण अशा बिकट परिस्थितीत सेवादीप व डोनेट एड सोसायटी ह्या समाजसेवी संस्था व दास १०० रुपये तर्फे भक्कम पाठिंबा देत आहेत. नुकताच या महिन्याचा आवश्यक किराणा देण्याची व्यवास्था जीवन संवर्धन संस्थेला करण्यात आली. दास चे स्वप्नील डफळ यांचे मित्र दास चे राहुल पाटील सर यांनी किराण्याची व्यवस्था केली. किशोरी अग्निहोत्री, नितीन घोडके सर यांच्या मार्गदर्शनानुसार सामान मिळाले , जीवन संवर्धन सारख्या अनेक संस्था आज समाजात कार्यरत आहेत. त्यांना व समाजातील देणगीदारांना जोडून मदतीचा सेतू उभे करण्याचे कार्य सेवादिप व डोनेट एड सोसायटी करत आहे .

धन्यवादडोनेट एड सोसायटी 100 रुपये सेवनिधी उपक्रमनिसर्ग

सध्या सर्वत्र कोरोनाचा हाहाःकार उडालेला आहे. त्यातून माणूस अजून पुरता सावरत नाहीये तोच कोकणातील अलिबाग श्रीवर्धन माणगाव परिसरात निसर्ग वादळाने थैमान घातले.

समुद्रात निर्माण झालेल्या वादळाने तेवढ्या पट्ट्यातील गावांची अक्षरशः दैना केली. राहत्या घरांच्या भिंती कोसळल्या. त्याखाली घरातील वस्तू दबल्या गेल्या त्यामुळे खूप नुकसान झाले. छप्पराचे पत्रे उडून गेले. चांगली नांदती घरे अचानक जमीनदोस्त झाली. डोईवरचे छत उडून गेल्यामुळे आता आसरा तरी कुठे घ्यायचा हा गंभीर प्रश्न निर्माण झाला.

घरांचे नुकसान तसं नारळी पोफळीच्या बागांचेही अतोनात नुकसान झाले. ही झाडे म्हणजे कित्येकांचे उत्पन्नाचे साधन होती. नारळाचे किंवा सुपारीचे एक झाड लावून त्याला फळ धरेपर्यंत किमान चार पाच वर्षे मध्ये जावी लागतात. त्यामुळे हे नुकसान सुद्धा कसे भरुन निघणार हा मोठा प्रश्नच आहे. वीजेचे खांब देखील समूळ उखडले गेले आहेत, तारा तर तुटल्याच. ही दुरुस्ती करायला सुद्धा एक ते दोन महिन्याचा कालावधी लागू शकतो.

त्यामुळे एकंदरीत निसर्ग वादळाचा हा तडाखा फार मोठा असून दीर्घकालीन मुदतीचा आहे.

डोनेट एड सोसायटी व सेवादीप --पुणे यांनी या वादळग्रस्तांसाठी मदतीचे पाऊल उचलले. नितीन घोडके सर व त्यांच्या टिमने प्रत्यक्ष भेट देऊन आधी पाहणी केली. त्यानुसार काय स्वरुपाची मदत अपेक्षित आहे व आपण काय प्रमाणात देऊ शकतो याचा अंदाज घेतला. त्याप्रमाणे देणगीदारांना मदतीचे आवाहन केले. बघता बघता आठच दिवसात अपेक्षित आर्थिक निधी उभा राहिला.

काही वस्तूरुपातही मदत आली. जसे की ब्लँकेटस्, सोलर दिवे, १०० पेक्षा अधिक किराणा किट,कपडे असे काही आवश्यक वस्तूंची खरेदी करुन दास टिम काल प्रत्यक्ष माणगाव परिसरात जाऊन आले. हर्णे व वाकी आदिवासी वस्ती आणि वनवासी कल्याणाश्रम माणगाव या ठिकाणी या मदतीचे वाटप समक्षच करण्यात आले.

ज्यांची आयुष्याची पूंजीच निसर्गाने हिरावून घेतलीय त्यांच्यासाठी ही मदत खूपच अल्पकालीन आहे. पण..उद्ध्वस्त गावातील ते उदास चेहेरे. पण अजूनही त्यांच्यात जगण्याची जिद्द कायम आहे. कुसुमाग्रजांची कविता आठवली.

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेऊन फक्त लढ म्हणा

कितीही वादळवारे आले व निसर्गाचा कोप जरी झाला तरी अजून ही लोकं भक्कम आहेत. आपले मानसिक बळ टिकवून आहेत. देवाजीने बहाल केलेल्या या सुंदर जीवनावर त्यांचे मनापासून प्रेम आहे. त्यांना जगायचय. त्यासाठी जिद्दीने लढायचय. परिस्थितीपुढे हार मानायची नाहीये. कुठून हे बळ निर्माण होत असेल त्यांच्या ठायी असाही विचार मनात आला. त्यांच्या या धैर्याला सलाम. म्हणूनच त्यांच्या या जगण्याच्या इच्छेला दास व सेवादीप तर्फे थोडी थोडी मदत करुन अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला आहे.
 • मदत केलेल्या संस्था व दाते
 • दास १०० रुपये ग्रुप
 • १प्रतिसाद फाउंडेशन
 • २रोस्ट्रम इंडिया सोशल ऑर्गनायजेशन
 • ३गुडविल इंडिया
 • ४ट्रिनीटी अॅडव्हेंंचर्स
 • ५वेदभूमी


वैयक्तिक दाते
 • १-जेनिफर पिंटो
 • २-तृप्ती पुट्टेवार
 • ३-उ्ज्वला खरे
 • ४-अमोल भुजबळ
 • ५-शर्मिला ताम्हणकर
 • ६-तृप्ती मुरलीधर
 • ७-ज्योती गंग्रास
 • ८-रोहिणी निंबाळकर
 • ९-कपिल कोराने
 • १०-वृंदा गुप्ता
 • ११-नरेंद्र आगे
 • १२-वर्षा कामत
 • १३-रवीन्द्रन मालूर
 • १४-किरण अपोटीकर
 • १५-तारीका राठोड
 • १६-श्रीनिवास उंडे
 • १७-दत्तराज सदेकर
 • १८-दिनकर माने


सर्वांचेच मनापासून आभार
लेखन
सौ.प्रिया जोग
२१.६.२०२०
डोनेट एड सोसायटी


डोनेट एड सोसायटी महिना १०० रुपये सेवानिधी तुन केलेला उपक्रम

ठाकर समाज विकासासाठी


नमस्ते
मी मनिषा राकेश चांदोरकर जिल्हा परिषद ,प्राथमिक शाळा पांगळोली(ठाकरवाडी) लोणावळा येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहे.
पांगळोली हे गाव 100%ठाकर समाज लोकवस्तीचे गाव आहे. गावाची लोकसंख्या जवळपास 550 आहे. गावात 1 ली ते 4 थी पर्यंत प्राथ शाळा असून पटसंख्या 25 असून शेजारीच अंगणवाडी आहे त्यांचा पट 22 आहे.

या लोकांना रोजगाराच्या कोणत्याही सुविधा उपलब्ध नाही. आजूबाजूच्या तळ्यातून मासेमारी करून व मिळेल तिथे मोलमजुरी करून त्यांचा उदरनिर्वाह चालतो, यांचीच मुले शाळेत आहेत.

साधारण 4,5 वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीने कर्ज काढून व काही संस्थेच्या मदतीने शाळेची इमारत बांधली. इमारतीसाठी अधिक निधी खर्च झाल्याने ग्रामपंचायतीला शाळेसाठी भौतिक सुविधा करता आल्या नाहीत. या भागात सतत 4 महिने 🌧पाऊस पडतो .पाऊस जरी जास्त असला तरी

 • १ पाणी साठविण्यासाठी काही सोय नाही. त्या साठी पाण्याची टाकीची सोया पाहिजे आहे.
 • २-पावसाचे प्रमाण जास्त असल्याने इमारतीचे छत गळून पाणी खाली येते,त्यामुळे वर्गात सगळे पाणीच पाणी असते. त्यामुळे छताची डागडुजी करणे, पत्रा शेड करणे ज्यामुळे स्लॅबचे lickage थांबेल अत्यन्त गरजेचे आहे.
 • या मुलांना शिक्षणाची गोडी लागली आहे. मुले 100%शाळेत उपस्थित राहतात, त्यांच्याकडून positive response मिळत आहे.
  प्राथमिक शिक्षण हा शिक्षणाचा मूलभूत पाया आहे, शाळेच्या या काही गरजा पूर्ण झाल्या तर अधिकाधिक मुले शिक्षणाच्या प्रवाहात येऊन या ठाकर समाजाचा विकास होईल व पर्यायाने संपूर्ण गावाचा विकास होईल.
सध्या पाण्याचे खूप हाल आहेत पण डोनेट एड सोसायटी 100 रुपये ग्रुप कडून टाकीची सोय करण्यात आली.त्यामुळे संपूर्ण गावाला त्याचा फायदा झाला. सोबत शाळेचे काही फोटो पाठवत आहे.

दास चे खूप आभार.


डोनेट एड सोसायटी महिना 100 रुपये सेवानिधी उपक्रम

स्नेहछाया_प्रकल्प_दिघीवंचित, निराधार, स्थलांतरित व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील २५ लेकरांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षण व पुनर्वसन करण्याची जबाबदारी घेतली आहे.सदर सामाजिक प्रकल्प शासकीय मदतीशिवाय केवळ संस्थाआणि समाजा तील दानशूर व्यक्ती व उद्योजक बांधव यांच्या मदतीने चालवला जातो आहे.

येथिल प्राथमिक व मुलभत गरजांची माहिती घेऊन सदिच्छा देण्यासाठी मागच्या आठवड्यात डोनेट एड़ सोसायटी पुणे चे प्रमुख नितीनदादा घोडके आणि किशोरीताई अग्निहोत्री यांनी प्रकल्पास भेट दिली होती.येथिल गरज लक्षात घेऊन

#DAS 100 रुपये च्या वतीने पोर्टेबल टॉईलेट साठी रू.10620 चा धनादेश संबंधित कंपनीच्या नावे माझ्याकडे दिला व भविष्यात देखील वंचीत लेकरांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी कायम सोबत राहू व मदत करू असे बोलत पुढील कार्यास शुभेच्छा व प्रेरणा मिळाली.आपल्या या नवनिर्माण कार्यासाठीच्या सहयोग,मार्गदर्शन व मार्गदर्शन याबद्दल आपले आम्ही ऋणी आहोत.

Thank you so much Nitindada, Kishoritai, Himani Tai,
Donar: Mr.Smitatai Dixit & #DAS_team


DAS 100 Rs Contribution Group Activity

#Tricycle_donated_to_Nilesh


Nilesh's life situation is very difficult at present. Only his right hand is functioning. Bcoz of increased body weight he can't even help himself to sit on the tricycle. It was very sad to witness that. Since he has lost his father, his responsibility is on his mother shoulder now. His mother has do all the work, including earning a living. Even their house is in such condition that it might collapse any day. When asked the mother said that it would b nice if we both die at the same time

But it felt really nice to be able to go there and help them all bcoz of our ₹ 100 whatsapp group.

If you feel inspired to make a small monthly contribution of Rs.100 and thereby help needy people like Nilesh then you are welcome to join our ₹100 Donation whatsapp group.

Donor: Swapnil Sir

#Lets_keep_up_our_good_work.


डोनेट एड सोसायटी १००रु सेवानिधी उपक्रम मार्फत

#Tricycle_donated_to_Nilesh


युवान मुलांच्या वसतिगृहातील भोजनासाठी लागणारी लिस्ट व संस्थेच्या कामाची माहिती दास तर्फे मैत्र जीवांचे ह्या सामाजिक संस्था यांना दिली असता त्यांनी लागणारा किराणा याची रक्कम दास कडे दिली व दास टीम युवान(नगर) पर्यंत किराणा पोहचवू शकली.

धन्यवाद मैत्र जीवांचे ह्या संस्थेचे, त्यांनी दास च्या कार्यावर विश्वास ठेवून मदत लागलीच केली आहे

धन्यवाद
किशोरी
डोनेट एड सोसायटी