डोनेट एड सोसायटी

महिला रणरागिणी

तसं पाहिलं तर आपलं प्रत्येकाचे आयुष्य हे एक रण असते. रण म्हणजे युद्ध ,सामना! कधी निसर्गाशी कधी परिस्थितीशी, तर कधी माणसांशी तर कधी आपल्याच आपल्याशी हा सामना असतो. हा सामना करायला आपल्याला हवी ती एक अलौकिक शक्ती ! असं म्हणतात की निसर्गानेच या शक्तीचे माप भरभरुन स्त्री च्या ओंजळीत किंवा पदरात टाकले आहे. तिची मानसिक शक्ती दुर्दम्य असते. कुठल्याही परिस्थितीशी टक्कर द्यायची तिची सहसा तयारी असते. त्यातही स्त्रीचे अनंतकाळचे रुप म्हणजे *मातेचे रुप* !! या रुपात तर तिची दिव्य शक्ती जागृत होते. आपल्या लेकराच्या कल्याणासाठी आणि उज्ज्वल भवितव्यासाठी ती सदैव सज्जच असते. म्हणूनच देवीला आपण मातेचा दर्जा देतो. आपण सारी तिचीच तर लेकरे. आपणावर तिची कृपादृष्टी अखंड रहावी म्हणून तर तिचे पूजन तेही मनोभावे करणे अपेक्षित!

वास्तविक हे पूजन नित्यपूजनच असावे. परंतु मनुष्यप्राणी हा उत्सवप्रिय आहे. निरनिराळे उत्सव साजरे करुन तो अनेक क्षण, अनेक कृती यांचा नव्याने सन्मान करत असतो. सुप्तगुण व शक्तीचे पुनरुत्थान करत असतो.

त्यातीलच नवरात्रीचा एक अत्यंत महत्त्वाचा उत्सव ! या उत्सवाच्या निमित्ताने स्त्री शक्तीचा जागर आणि सन्मान करायचा. स्त्री ही शक्तीदेवतेचेच एक अंशात्मक रुप ! त्यामुळे तिला शक्तीचा वारसा तर प्राप्त झालेलाच असतो. तिची जिद्द व कष्ट करण्याची तयारी आणि महत्त्वाकांक्षा जर जबरदस्त असेल तर खरच ती शून्यातून पुन्हा विश्व निर्माण करु शकते. तिला हवे असते फक्त मनापासून प्रोत्साहन व व्यावहारिक स्वरुपाचा एक मदतीचा हात आणि आशीर्वाद !!

सध्याची परिस्थिती जाणून दास टिमने नवरात्रीचे औचित्य साधून हाच एक नवा विचार केला. जी मुळातच सक्षम, आशावादी व प्रयत्नशील आहे. आपल्या कुटुंबावर जिचे मनापासून प्रेम आहे. कुटुंबाचा ढासळलेला डोलारा जिला नव्याने सावरायचा आहे. शोधात आहे एका मदतीच्या हाताच्या ! अशा नऊ रणरागिणींचा सन्मान करायचे ठरवले. ज्या कष्ट करुन आपला संसार सावरु पहात आहेत त्यासाठी त्यांना आर्थिक व आवश्यक ती वस्तूरुपाची मदत देऊ केली जात आहे.

मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे आत्मनिर्भर भारताचे आवाहनही यात विचारात घेतले आहे. ती सबला स्वतःचा संसार सावरायला उत्सुक व इच्छुक आहे. फक्त हा अडचणींचा डोंगर सावरायला हवा आहे गिरीधारी भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद! आपणा सर्वांच्या शुभेच्छा तिच्या पाठीशी सदैव आहेतच. या रणरागिणींचा हा अनोखा सन्मान करण्याचा विचार दास टिमने केला. त्या आवाहनाला आपण सर्वांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे भरभरुन प्रतिसाद दिला आहेच.

सर्वांचे मनापासून आभार रणरागिणींच्या कर्तृत्त्वाला सादर वंदन आणि खूप खूप शुभेच्छा

डोनेट एड सोसायटी

लेखन
सौ.प्रिया जोग
२४.१०.२०२०


डोनेट एड सोसायटी रणरागिणी उपक्रम महिला तेथे सक्षम प्रगतीच्या पाऊल खुणा

जिद्दिने तत्पर असल्यावर लोखंडाला हि सोनं बणवण्याची ताकद एका कर्तत्ववान महिलेमध्ये असते


छायाबाई चव्हाण वास्तव्य मालेगाव येथे स्थायिक झाले पति लक्ष्मण धोंडिराम चव्हाण 2014 मध्ये निधन झाले. तीन मुले आहेत. जाणून घेऊया आज त्यांच्या बद्दल आम्ही मुळचे राजस्थान येथिल जात (घीसाडी) धंदा लोहारी आम्ही कामासाठी फिरस्ती करत असतो मालेगाव शहरातील पोटासाठी असरा मिळाला आता सात- आठ वर्ष झाले. कर्ता व्यक्ती गेल्यापासून लोहार कामाचा भार माझ्यावर पडला आणि माझे तीन लेकरं त्यांची पालन पोषण करण्याची जबाबदारी माझ्यावर पडली कोणाचं पाठबळ नसता,असं विचित्र आवस्थेतमधलं जीवन कसं सावरायचं कसं जगायचं धर्ता,कर्ता माणूस गेल्यावर एका महिलेच्या आयुष्यावर काय परिणाम होतो.

हा नियतीचा दृष्ट बेत,एका महिलेच्या जगण्याला घात ठरतो. पोटापाण्यासाठी व लेकरांच्या भविष्यासाठी दिन रात झटणारी रणरागिणी जिद्दीने आपल्या आयुष्याचा खचलेला पाया भक्कम करण्याचा आतोन आत प्रयत्न करणारी छायाताई परिणामकारक परिस्थिती असल्यावर सुध्दा लोहार कामात जिद्दीने एकवटलेली आहे एक निराधार महिला व तिचे मुले कसं बसं फाटक्या संसाराचं गाडा ओढत आहे.

छायाताईंना आज खरोखर मदत त्या करत असलेल्या लोहार कामाच्या वस्तू घेण्यासाठी जर आपण त्यांना दास च्या दात्यांकडून पाठबळ केले त्यामुळे त्यांच्यातली आनंदाची उत्सुकता व काम करण्याची जिद्द वाढली.

 खुशी की एक छवि हसी होती है
 पलभर की जिंदगी सुहानी होती है
 प्रयास करे हर हल को सुलझाने का
 सक्षम बने इतना,की कमजोर ना बने अस्मानी तुफान से
 सही रास्ता दिखता नहीं, तो सही वक्त पे दिखाने वाला मिल जाता है...

सुरेशजी चौधरी यांच्या सांगण्यावरून डोनेट एड सोसायटीच्या सहकार्यणी किशोरी ताई अग्निहोत्री यांनी छायाताई यांच्या लोहार कामातील कार्यस्थितीचा आढावा घेत नितीन घोडके यांच्या बरोबर चर्चा करून या बिकट परिस्थितीवर मात कशी करायची ह्या हेतूने

डोनेट एड सोसायटीचे सर्व सहकारी, दाते तृप्ती व वरून पुट्टेवार कुटूंबाने त्यांच्या लाडकी लेक रुचा हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मदतीचा हात पुढे केला आणि लोहार कामातील ज्या वस्तूंची आवश्यकता आहे. ती म्हणजे विळा,पावशी,कुऱ्हाड,खुरपी,सुरी,सांची,इ. वस्तू बणवण्यासाठी लागणारे साधन व कोळशापासुन चालणारे मशिन त्याना उपलब्ध करून दिले.

खरंच दात्यांचे खूप खूप आभार त्यांनी छायाताईच्या संसारासाठी चांगला हातभार लावला.

छायाताई डोनेट एड सोसायटीचे मनस्वी आभार मानत आहे...धन्यवाद लेखन.... गौतम केदारनाथ जगतापडोनेट एड सोसायटी रणरागिणी उपक्रम महिला तेथे सक्षम प्रगतीच्या पाऊल खुणा

महिला रणरागिणी असते प्रत्येक कार्यात गुणसंपन्न


मी रेणुका चौधरी रा.चिंचवार(जिल्हा:धुळे)

मी एक गरीब शेतकऱ्यांची पत्नी आहे, माझ्याकडे थोडीशी जमीन आहे. अल्पशा शेतीत ४-५ वर्षांपासून पावसाळी दुष्काळ त्यापासून कोणतेही उत्पन्न होत नाही आहे व आता ही कोरोना महामारी......

मला २ छोटी मुले आहेत,जीवन अतिशय कष्टमय व असह्यय झाले आहे. पण मी लढणार,कष्ट करणार मी परिस्थितीशी झगडणार माझ्या लेकरांसाठी त्यांना मला शिकवायचे आहे मोठे करायचे आहे.

मी शेती बरोबर आई वडिलांकडे असतांना ब्युटी पार्लर चा कोर्स केला होता त्यामुळे ह्या कोर्सची मदत माझ्या संसाराला होत होती.

आमच्या छोट्याशा गावात नवरी सजवायचे थोडे फार काम मिळते पण त्यासाठी देखील पैश्याच्या अभावी पार्लरसाठी लागणाऱ्या सुविधा नव्हत्या, साहित्यासाठी भांडवल नाही, जिद्द आहे पण मार्ग सापडत नाही पण लेकरांसाठी मन सुन्न होत होते

माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण म्हणजेच डोनेट एड सोसायटीने केलेली मोलाची मदत त्या बद्दल माझे मत

प्रत्येक महिला काहींना काही कामगिरी करून आपले व आपल्या परीवाराचे नाव उंचावते व त्या साठी लागणारे पाठबळ भक्कम असावे तरच ती महिला चांगल्या प्रकारे कामगिरी करू शकते.

माझ्या सारख्या अनेक महिला आहेत ज्या परिस्थितीने पुर्णपणे जखडल्या आहेत, मरगळलेल्या अवस्थेत ते आपलं जीवन व्यतीत करत आहे.

कला आहे पण कुठल्याही कामाचं साधन त्यांच्याकडे शिल्लक नाही कार्यगुण असल्यावर सुद्धा करायचं काय हा प्रश्न वारंवार त्या महिलांना भेडसावत असतो,

मग कुठलाच पर्याय उरत नाही शेवटी विश्वासासारखं अमुल्य साधन त्या महिलांना गमवावं लागत आणि असाह्ये परिस्थितीचं जीवन जगावं लागतं परिस्थिती हि माणसाला लाचार करून सोडते म्हणून प्रत्येक कार्यकुशल महिला परिस्थितीला न जुमानता व न लाचार होता, आतून दृढविश्वास जागवून पुनः शुभारंभ करून आपल्या कार्याचा ह्या भावनेने,

माझ्या परिस्थितीला सावरण्यासाठी व माझ्या कार्यगुणाला साधन मिळावे ह्या हेतूने सुरेश बाबांनी माझी सर्व परिस्थिती डोनेट एड सोसायटीचे क्रियाशील सहकार्यणी मा. किशोरी ताई अग्निहोत्री व मा.नितीन जी घोडके यांना कळवली माझ्या कार्याची व परिस्थितीची दखल घेत दास चे कार्यकर्ते मा. स्वप्नील डफळ यांचे दातृत्ववान मित्र मा. राहुलजी पाटील साहेब यांच्या कडे शब्द टाकला व यांनी लवकरात लवकर ब्युटीपार्लर खुर्ची व ड्रेसिंग टेबल व काही पार्लर साहित्य घेण्यास साह्य पुरवले व आज प्रत्यक्षात माझ्या समोर कला जोपासण्यासाठी कार्यगुणाचं साधन मला भेटलं ते ही डोनेट एड सोसायटीचे सर्व सहकाऱ्यामुळे माझ्या आयुष्यात आशेचा किरण जागला

मी त्यांचे मनापासून सप्रेम धन्यवाद मानते माझ्या सारख्या अनेक कार्यकुशल महिला मरगळ न होतो डोनेट एड सोसायटीचा एक आधार घेऊन परिस्थितीवर मात करू, प्रगतिपथाचा कास धरू या हेतूने डोनेट एड सोसायटीचे... धन्यवाद आभार

संवाद लेखन

सुरेश चौधरीडोनेट एड सोसायटी रणरागिणी उपक्रम महिला तेथे सक्षम प्रगतीच्या पाऊल खुणा

महिला रणरागिणी असते प्रत्येक कार्यात गुणसंपन्न

कऱ्हाड जवळच्या गोपाळ वस्तीत राहणारी एक महिला. नाव अर्चना नामदेव जाधव वय 31 लग्न झाल्यानंतर व्यसनाधीन पती मारहाण करायचा रोज राबायच आणि रोज मार खायचा असा तिचा दिनक्रम. पण आधाराला पती हवा हे समाजाने बिंबवलेलं त्यामुळे ती दिवस ढकलत होती. पण पुढे पुढे हे प्रमाण वाढले नवऱ्याचे वागणे अजून खराब झाले, दारू प्यायची घरात काही द्यायचं नाही दहा पंधरा दिवस घरातून गायब रहायचं घरी यायचंच नाही. आल्यानंतर मात्र संशय घेऊन मारहाण करायची. हे सगळं आता तिच्या सहन शक्ती च्या पलीकडे गेले.. बहिणी शिवाय कुणी जवळचे नव्हते मग बहिणीच्या आसऱ्याला ती आली. सासरी परत जाणे तिला शक्य नव्हतं आणि नवराही घ्यायला आला नाही. बहिणीने आसरा दिला पण तिचीही परिस्थिती बेताची.

उदरनिर्वाहाचे साधन नाही. काम शोधले पण या कोरोना मुळे कुठे कामही मिळेना.उपासमार होऊ लागली. या वस्तीत येऊन काम करणाऱ्या श्रीशा फाउंडेशनच्या कार्यकर्त्या धनश्री पाटील यांच्याशी भेट झाली. धनश्री ताईंनी त्यांची परिस्थिती पहिली सगळ्या गोष्टीची चौकशी केली. मग त्याबद्दल सेवांगण फाऊंडेशन च्या कार्यकर्ता मनिषा नाईक यांना याबद्दल सांगितले. चौकशी दरम्यान तिला शिवणकाम येत असल्याचे कळले. काहीतरी मदत मिळाली तर एक गरीब गरजू स्त्रीचे आयुष्य उभे राहू शकेल याबद्दल एकमत झाले. मनिषा ताईंनी डोनेट एड सोसायटीच्या कार्यकरत्या किशोरी अग्निहोत्री यांच्याशी सम्पर्क साधला. कारण किशोरी ताई आणि नितीन घोडके यांनी डोनेट एड सोसायटीच्या माध्यमातून अनेक गरजू गरीब महिलांना मदत करून त्यांना व्यवसाय उभारणी साठी मदत केली आहे. त्यांचे हे कार्य मनिषा नाईक यांनी जवळून बघितलेले. गरीब गरजू महिलांना या आधीही शिलाई मशीन घेऊन देऊन आपल्या पायावर उभे करण्याचा वसा डोनेट एड सोसायटीच्या किशोरी ताई आणि नितीन घोडके यांनी घेतला आहे. या केस मध्ये देखील डोनेट एड सोसायटी नक्की मदत करेल याची मनिषा ताईना खात्री होती. किशोरी ताईशी याबाबत बोलल्यावर त्या लगेच मदत करायला तयार झाल्या. मग धनश्री ताई, मनिषा ताई आणि किशोरी ताई यांचे कॉन्फरन्स वर बोलणे झाले. सर्व प्रकारची खात्री पटल्यावर किशोरी ताईंनी मदत करायचे ठरवले. मग पुढील हालचाल चालू झाली सगळी प्रोसिजर पूर्ण झाली.

धनश्री ताईंनी शिलाई मशीन विक्रेत्या कडे जाऊन मशीन पहिली व मनिषा ताई आणि किशोरी ताईंना संपर्क केला. किशोरी ताईंनी डोनेट एड सोसायटीच्या माध्यमातून मदतकर्त्या दात्याशी संपर्क साधला.

दाते अमित व ज्योती भांडारी यांनी त्याच्या लाडक्या मुलीच्या नावाने रेवा हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिलाई मशीनची दिली.

आणि एका गरजू महिलेच्या ताब्यात शिलाई मशीन आली. एका निराश महिलेला जगण्याचे बळ मिळाले.

ती आता खूप आनंदी आहे. तिच्या हातात तिच्या हक्काचे शिलाई मशीन आले आहे. ती म्हणते "मी आता खूप काम करणार आणि पैसे मिळवणार. माझे सगळे हाल दूर होतील. मला जगण्याचा मार्ग मिळाला." तिच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप काही सांगत होता. हे सर्व दात्यांच्या मूळे शक्य झाले,दाते अमित भांडरी याचे शतशः आभार आहे

किशोरी ताई अग्निहोत्री आणि नितीन घोडके सर यांचे ती मनापासून आभार मानत आहे. यासाठी माध्यम झालेल्या मनिषा ताई आणि धनश्री ताई यांना ही ती पुन्हा पुन्हा धन्यवाद म्हणत आहे.


डोनेट एड सोसायटीडोनेट एड सोसायटी रणरागिणी उपक्रम महिला तेथे सक्षम प्रगतीच्या पाऊल खुणा

महिला रणरागिणी असते प्रत्येक कार्यात गुणसंपन्न

निलीमा सोनवणे, शिक्षण- MA- Advance beauty parlour course सद्या आडगाव नाशिक राहतात दोन मुले आहेत, जाणून घेऊया निलीमा सोनवणे यांच्या कार्य गुणातली अपार जिद्द...

निलीमा यांनी ब्युटी पार्लरचा कोर्स केला आहे त्यांना चांगल्याप्रकारे कला अवगत आहे. पण आर्थिक पाठबळ नसल्याने त्या हतबल झाल्या आहेत. ज्या गोष्टीचा अनुभव आहे. पण प्रत्ययास आणता येत नाही,माझं कार्य व त्या बद्दल माझी जिद्द कशाप्रकारे साकार होऊ शकते याचा मला वारंवार प्रश्न पडायचा सद्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर कुठलेचं काम हाताला मिळत नाही,कला ,अनुभव असुन पुरेसे कुणा कडून आर्थिक पाठबळ मिळत नाही किंवा आवश्यक त्या पार्लरच्या वस्तू घेण्यास कोणी मदत करत नाही. माझ्यातली कला माझं आयुष्य सुखकर करेल मला आशा आहे माझ्या कार्याला हातभार लागावा

आज माझ्यातली जिद्द प्रत्ययास आणण्यासाठी डोनेट एड सोसायटीचे सहकार्यणी मा. किशोरी ताई अग्निहोत्री व नितीन घोडके व मोहनीश यांनी परिस्थितीचा आढावा घेत माझ्यातली कार्य संपन्नता जाणून घेतली.

मला लवकरात लवकर दात्यांच्या मार्फत सौ सुप्रिया रायखेलकर कडून मृण्मयीच्या वाढदिवसाच्यानिम्मित रणरागिणी उपक्रमास पार्लर ची खुर्ची दास च्या मार्फत मला देण्यात आली आहे.

दात्यांचे मनापासून आभार त्यांच्या दातृत्वामुळे एका महिलेचा आत्मविश्वासात वाढ होऊन आलेल्या संधीचा सदुपयोग करून नव्याने पार्लरची सुरवात केली.

डोनेट एड सोसायटीचे व सर्व टिमचे ज्यामुळे मला माझा आशेचा किरण जागृत करता आला मी कार्यमग्न होऊन सुखकर आयुष्य जगण्याची सफल वाटचाल करण्यास तत्पर झाली आहे,

माझ्या सारख्या अनेक हतबल महिलांना सक्षम करण्याचं काम डोनेट एड सोसायटी जरूर करेल

असेल दया भाव तिथे घडले विश्व रणरागिणी कल्पतरू आणि होतील "महिला तिथे सक्षम प्रगतिच्या पाऊल खुणा"

प्रत्येक महिला आपल्या स्वत:च्या पायावर उभी राहण्यासाठी तत्पर असते परंतू परिस्थिती अशी काल स्थिती असते जी आयुष्यात दु:खं झेलण्यास भाग पाडते महिला हि परिस्थितीवर मात करणारी एक रणरागिणी आहे. ती अपार दुःखालाही सुखात बदलू शकते इतकी असिम भक्ती ती आपल्या कर्तृत्वावर करते. दातृत्वाची धाव हतबलाकडे घेतल्यावर,खचल्या जीवालाही आधाराची उब मिळते.

दान केल्याने कुठलाच अभिमान नसावा,अभिमान हा तेव्हा असावा जेव्हा आपल्या दानातून श्रेष्ठ कर्तृत्व कोणाचं तरी घडावं, हा मानवी जीवनाचा गुणधर्म आहे ,निती मुल्याच्या आधारे चालणारा समाज संपन्नतेच्या मार्गावर नक्की चालणार, हा माझा उपदेश आणि एक संदेश आहे.ज्याप्रकारे डोनेट एड सोसायटी हतबल महिलांसाठी व गरजु लोकांसाठी एक सेवा रूपी आधार बनला त्यातून मिळणारी इतरांना प्रेरणा द्विगुणित आहे.

लेखन कवी -गौतम केदारनाथ जगताप

संवाद संकलन
गौतम केदारनाथ जगतापडोनेट एड सोसायटी रणरागिणी उपक्रम महिला तेथे सक्षम प्रगतीच्या पाऊल खुणा

स्वप्न माझं कार्यमग्नात पुर्ण होईल..

मी किरण ज्ञानेश्वर सोनवणे,माझं वय आता (२८वर्ष)आहे. रा.मालेगांव कॅम्प मला दोन मुली आणि एक मुलगा आहे.माझे मिस्टर मार्केट मध्ये हमालीचं काम करतात माझ्या बद्दल सांगायचे झालं तर मी अनेक वाईट प्रसंगांना तोंड दिले आहे. पण मी आत्मविश्वास कधी गमवला नाही

अवधान अनेक वाईट प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतं जातात, जात असतात. परंतु आपले कतृत्व ठळक पणे दिसल्यावर वाईट प्रसंग ही बाद होतात.हे मात्र खरं आहे.

२०१० मध्ये शिलाईन कामात सहा महिन्यांचं प्रशिक्षण घेतलं चांगल्या प्रकारे मी शिवण कामाचा अनुभव घेतला छान छान डिझाईनिंग कपडे शिवु लागली, माझ्या आई वडीलांनी मला त्यावेळेस सेकंड मध्ये शिलाईन मशिन घेऊन दिलं होते,

तेव्हा माझ्यातला आत्मविश्वास द्विगुणित वाढला प्रचंड उत्साह,आनंद माझ्या दैनंदिन जीवनात मला जाणवत होता. शिलाईन मशिन सेकंड जरी होतं तरी माझ्यासाठी मोठं गिप्ट होतं, माझ्या हातावर ची कला जोपासण्यासाठी एक उच्च कोटीतलं विकसित साधन होतं

शिलाईन कामात मी अनेक प्रकारे छोटी मोठी कामे करू लागली घराला हातभार लागावा माझ्या लेकरं बाळांचा दैनंदिन खर्च भागावा या आशेनं माझं शिवण काम चालूच ठेवलं,चांगल्या कामाचा चांगला फायदा मिळतो या हिशोबाने मी चांगल्या प्रकारे शिवण काम करू लागली

आपली क्षमता, आत्मविश्वास,अवघड काम यशस्वी करतं वाईट प्रसंगाला मी कधी ही खचलो नाही,उलट मी वाईट प्रसंगाचं स्वागत करू लागली.

कारण आपण खचल्यावर अपंगतत्वाचं लाचारी पण आपल्यात समरस होतं,म्हणून न खचता पणती सारखं सदैव प्रकाश देत तेवत रहायचं हा गुणधर्म माझ्या आई वडीलांच्या संस्कारांने जागृत झाला.

शिवण कामाच्या उत्तुंग भरारीने चांगले अनुभव प्रत्ययास आले परस्थिती जरी नाजुक असली तरी आपल्या मनगटातलं बळ भक्कम पणे संचारत आहे.

नियती आपल्या आयुष्यात काय काय खेळ खेळते प्रत्येकाच्या आत्म्यालाचं माहीत २०१९ मध्ये माझ्या मिस्टरांचा अक्सिडंट झाला होता पायाला जबर मार लागल्याने मोठी जखम झाली होती त्यांचे उपचार करण्यास पुरेसे पैसे नसल्याने मी शिलाईन मशिन ३हजारला विकुन टाकले,त्यांचा उपचार केला दोन महिने त्यांचं काम थांबलं आणि माझ्या हातावरचं ही काम थांबलं दुसरं काही साधन नव्हतं दोन तीन महिने आई वडीलांनी अन्न ,धान्य ,बाजार हाट पुरवला त्यांचीही परस्थिती नाजुक असल्याने मला मदतीची आशा नव्हती ,जे होईल ते सर्व काही त्या भाग्यविद्यात्यावर सोडलं होतं मी

खरं म्हणजे आई वडीलचं आपले खरे देव आहेत त्यांना आपल्या लेकरांची काळजी वाटते.

कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर हातावरचं काम गेलं सहा सात महिने झाले तरी हातावर कवडी मोल साधन नाही माझा माझ्या मुला बाळांचा खान्याचा प्रश्न,आरोग्याचा प्रश्न कसा भागेल या आशेनं मी किरण सोनवणे आपणास कळकळीची विनंती करते की मला माझ्या हातावरचे साधन मिळवुन द्यावे, पुन्हा माझा आशेचा किरण फुलकीत व्हावा पुन्हा मी कार्यमग्न व्हावे....शिलाईन मशिनने पुन्हा सुखाचा शुभारंभ नक्की होईल माझ्या आयुष्यात "तुमचा मदतीचा हात,माझ्या परस्थिवर मात करेल"..

परस्थितीची दखल घेत डोनेट एड सोसायटीचे सहकार्यनी किशोरी (ताई) अग्निहोत्री व नितीन घोडके यांनी डोनेट एड सोसायटीची सर्व माहिती दिल्यावर श्री सुरेशजी चौधरी व गौतम जगताप यांना सांगितल्या प्रमाणे एका हतबल महिलेला सक्षम कसं बनवायचं एक मदत कशी सत्कर्मी लावायची परस्थितीला सुधारण्यासाठी दुकानातून किराणा माल घेण्या ऐवजी स्वत:च्या पायावर उभे रहाण्यासाठी शिलाईन मशिन घेऊन रोजगार प्राप्त व्हावा

एड सोसायटीच्या वतीने स्वप्नील डफल यांचे मित्र *दाते- राहुलजी पाटील साहेब यांच्या मोलाच्या साह्याने माझ्या सारख्या कित्येक दुर्बल घटकातील हतबल महिला डोनेट एड सोसायटीच्या मदतीने सक्षम बनतील पुन्हा त्यांचं स्वप्न कार्यमग्नात पुर्ण होईल.

डोनेट सोसायटीचे सर्व सहकारी व अनमोल कार्यदर्शक दाते-राहुलजी पाटील यांचे खूप खूप आभार...आपले असेचं कार्य किर्तीवंत होवो.... धन्यवाद

   डोनेट एड सोसायटीचे कार्य
   दिन दुबळ्यास बनवते सक्षम
   मदतीस सदैव तत्पर असते
  दास बनुनी होते सेवा धाम

 कोणी हतबल होते,त्यासी दास मजबूत बनवते
 जगण्यास बळ साह्य दास होते

संवाद संकलन
गौतम केदारनाथ जगतापडोनेट एड सोसायटी रणरागिणी उपक्रम महिला तेथे सक्षम प्रगतीच्या पाऊल खुणा

महिला तेथे सक्षम प्रगतीच्या पाऊलखुणा


मी सौ. सोनल मालेगांव येथील रहिवासी असून माझें एक छोटेसे कुटुंब आहे. ह्या कोरोनाच्या काळात बऱ्याच संकटांना मला सामोरे जावे लागत आहे,संसार चालविताना खूप ओढाताण होत आहे,पण त्यात एक आशेचा किरण डोनेट एड सोसायटी मुळे मिळाला,मला शिवणकला अवगत होती पण शिलाई मशीन नसल्यामुळे मी काहीच संसारासाठी हातभार लावू शकत नव्हते,माझ्या कलेला वाव मिळाला तो फक्त दास मुळेच

मला सरोदे परिवाराने दास च्या माध्यमातून शिलाई मशीन माझ्या संसाराला हातभार लावला आहे | आता मी कष्ट करेन स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा जे समाधान आहे ते खरंच शब्दात व्यक्त करता येत नाही आहे

दास चे मनापासून धन्यवाद असेच कार्य दात्यांच्या मार्फत घडावे हीच शुभेच्छा

सरोदे परिवार दात्यांचे मनोगत

माझ्या मुलाचा अवनीश चा वाढदिवस 8 ऑक्टोबर ला असतो, दरवर्षी त्याच्या वाढदिवस निमित्ताने मी व माझा परिवार काहीतरी दान करतो, योग्य ठिकाणी गरजू व्यक्तींसाठी काहीतरी फुल न फुलाची पाकळी असा सहभाग घेतो, आता तुम्ही म्हणाल , मग वाढदिवस च का? , दान धर्म आणि समाज कार्य हे तर कधीही करू शकतो त्याला वेळ नाही आणि काळ नाही. खरंय हे, परंतु मी व माझे पती नौकरीमुळे वेळ नाही काढू शकत, म्हणून आम्ही हा नियमच ठरवून टाकला की मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने का होईना, आपण वेळ काढायचाच, आणि इतरही वेळी जमेल तसं प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आम्ही यात सहभागी होतो,

हा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभाग माझी मैत्रीण दास foundation ची member किशोरी अग्निहोत्री मुळे खरंतर शक्य होतो.

अर्थातच दरवर्षी वढदिवशी कुठं जावे , कोणासाठी कार्य करावे याचे मार्गदर्शन माझी मैत्रीणच मला करते. मग या वर्षी आम्ही प्रत्यक्षात कोणाला भेटू शकत नव्हतो, पण मग ठरलेला नियम व्हायला हवा,आणि आता काय करावे. मी लगेच किशोरीला कॉल केला, आणि मग तिला लगेच लक्षात आले , तिने मला संगीतले तुला यावेळी कुठेही प्रत्यक्षात भेट देता येणार नाही. मलाही ते लक्षात आले, मग ती सांगू लागली, तिच्या अभ्यासानुसार खुप साऱ्या लोकांच्या सध्या नौकऱ्या गेल्या आहेत, महिलांना हातावर कामे नाहीत, रोजचं पोट भरणं अवघड झालंय, तू अन्नदान केलेस तर ते एक दिवस होईल पण पुन्हा दुसऱ्या दिवशी काय करायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे, त्यांना आपण अशी काही मदत केली पाहिजे ज्याने कोणीतरी स्वतःच्या पायावर उभे राहील आणि मग स्वावलंबी बनून आपल्या परिवाराला आपल्या कष्टाने मोठं करेल.

दास चा महिला तेथे प्रगतीच्या पाऊल खुणा हा उपक्रम मला खरंच आवडला मी हे सगळं ऐकून अगदी भारावून गेले, मी ऐकतच होते, तेव्हा ती म्हणाली अश्या काही महिला आहेत ज्यांना शिवण काम येते, परंतु शिवण मशीन नाही म्हणून त्या काहीच करू शकत नाही.

मी लगेच म्हटले "मी तयार आहे, मी 5000 पर्यंत देईल, असंही यावेळी वाढदिवसाशिवाय अधिक मासाचेही निमित्त आहे. माझ्यामुळे एखाद्या महिलेला अशी मदत मिळणार असेल आणि तिच्या कुटुंबात सूख नांदनार असेल तर मला खूप आनंद होईल".

आता तुम्ही म्हणाल, अधिक महिना , वाढदिवस असे निमित्त का ठरवायचे? ही एक शिस्त आहे असे म्हणूयात, आपल्या भारतीय संस्कृतीत आपल्याला सणांचे असे काही नियम लावले आहेत की त्या निमित्ताने आपल्या हातून काही चांगल्या गोष्टी घडाव्यात. वाढदिवसाच्या दिवशी आपण आपल्या मुलाला चांगले आयुष्य आणि आरोग्य लाभावे त्याला दीर्घ आयुष्य लाभावे म्हणून देवाजवळ प्रार्थना करतो, हो ना??, मग या निमित्ताने जर आपण कोणाला मदत केली तर ती व्यक्ती देखील आपल्या मुलाला आणि आपल्या परिवाराला मनापासून आणि भरभरून आशीर्वाद देईल. आणि माणसातील हा देवाचा आशीर्वाद खरा ठरल्याशिवाय राहत नाही.

अधिक महिना हा तर दानासाठी श्रेष्ठ च मानला जातो. खरंतर "दान हा एक सर्वश्रेष्ठ धर्म " आहे. मग तुम्ही कोणतेही निमित्ताने ते केलेत तरी ते सफळ ठरणारच.

आता हेच पहा नवरात्र सुरू झाली आहे , आपल्या कडे या काळात मुलींचे पूजन केले जाते, जमेल तिथे पीठ, मीठ घालुन दान केले जाते, घरात अखंड दिवा ठेवण्याची ही खूप प्रथा आहे, बरेच जण उपवास करतात , देवीचे वेगवेगळे रंग आहेत असे मानून त्या त्या रंगांचे कपडे घालूनही बरेच जण आनंद साजरा करतात, ज्या त्या देवीचे स्मरण करून आपण आपल्या परिवाराला सुखच मागत असतो. त्या निमित्ताने जर आपण या गरजू लोकांसाठी जर काही केले अर्थात त्यांच्या घरी अन्न रोज शिजेल, त्यांच्या आयुष्यात आपल्या मदतीने हळूहळू प्रकाश वाढेल, त्यांचे आयुष्यही रंगाने भरून जाईल आणि सर्वजण सुखाने आणि मानाने आपल्या परिवाराची काळजी घेऊ शकतील.

या ..... या....आपण सर्वजण काही निमित्त ठरवू या, घडेल ते आपल्या हाताने देवूया, आपल्यातल्याच या सर्व लोकांना मदतीचा हात देऊया. आणि वर्षभरात असे ठरलेले नियम न चुकता पाळूया.

माझी आई नेहमी म्हणते, " आपण मनापासून कोणाला काही दिले की आपल्याला दुप्पटीने सगळे परत मिळते", अर्थात आशीर्वाद, सुख आणि महत्वाचे म्हणजे समाधान. " दानधर्म ही एक investment आहे, ही कराच" करताना फक्त समोरच्याचा सुखाचा विचार करा. आपोआपच त्यांच्या त्या अश्रूंची फुले होतील आणि तुमच्यावर आनंद आणि सुखाची बरसात होईल.

आपण महाभारत जाणता, त्यातील कर्ण ही जाणता, त्याच्यासारखे दानशूर कदाचित आपण नाही बनू शकत, आणि मी म्हणतही नाही तसे बना,

आपण संत तुकारामासारखे आपले सर्वच देऊ नाही शकत आणि तसे आपल्याला करायचे ही नाही, आपण निमित्ताने कोणाच्या तरि आयुष्याला चांगली दिशा देण्याचे निमित्त ठरूया.. एवढेच काय ते मला या निमित्ताने सांगायचे होते. "काही चूक भूल" माफ असावी.

माझी सोनल ताईंना ( ज्यांना माझी सेवा पोहचली) एक विनंती, आमची ही थातुरमातुर सेवा मान्य करावी आणि फुलाची पाकळी गोड मानून घ्यावी.

दाते व लेखन
रोहिणी सरोदे.

धन्यवाद
डोनेट एड सोसायटीडोनेट एड सोसायटी रणरागिणी उपक्रम महिला तेथे सक्षम प्रगतीच्या पाऊल खुणा

नव नवीन कला जोपासुन विकसित करण्याचं पाठबळ म्हणजेच डोनेट एड सोसायटी आणि त्यांचे सर्व सहकारी आहेमी.जितेंद्र बाळू कांबळे
रा. दरेगाव,
आजची रणरागिणी माझी आई त्यामुळे आईवर लिहलेली माझी कविता

    
 " आई ही आजची रणरागिणी

आई आजची रणरागिणी ,नाव देऊन पित्याचं नेई!

कष्ट करुनी आई आमच्या पाठीशी उभी राही, भोळी भाबडी आई खरं प्रेम देई !

संघर्षाचे काढून यात्रा युतीच्या सत्तेसाठी, कमळाच फुल फुलविले!

झुंज घेऊन संघर्षाची हाती, आमच्या भल्यासाठी सुख-दुःखात धावून येई !

दीन दुबळ्या गरीब लेकराची तू खरी आई, स्वतःच्या हिमतीवर कष्टाचा डोंगर उभा करून घेई!

आमच्या कल्याणासाठी अहोरात्र रात्र झटली, अंधाराला मागे सारून नवीन ज्योत पेटविली!

धन्य धन्य हो आई तुझे थोर उपकार , नाव तुझे सर्व विश्वात गरजे सरकार!"
   

माझी सर्व परिस्थिती:
माझे आई वडिल हे खाट विणण्याचे काम पंधरा वर्षांपासून करतात खाट विणणे ही एक मेहनती कला आहे ती जपून व टिकवून ठेवण्याचे काम माझ्या आईने केले आहे कारण वडील माझे आजारी पडले होते तेव्हा आईने खाट विणण्याची कला ती शिकली

एक कला शिकण्याची मुख्य कारण शेत मजूर मजुरी ने आणि घर चालत नव्हते त्यासाठी कलेची मेहनत घ्यावी लागली खाट विणण्याची कला आम्हा सर्वांना आई वडीलांमुळे ही कला अवगत आहे भांडवल व आर्थिक मदत नसल्यामुळे आम्ही काही करू शकलो नाही.

परंतु आता आभार मानतो मी किशोरी ताई आणि चौधरी सर यांना ही सर्व परिस्थिती माहीत होती, आर्थिक भांडवल यासाठी ताईनी तीन खाटांची लागणारे साहित्याची मदत देऊ केली.

डोनेट एड सोसायटी च्या किशोरी ताईंनी मा. नितीन सर यांच्याबरोबर व त्यांची मैत्रीण तृप्ती पुट्टेवार यांना आमची सर्व परिस्थिती सांगितली.सर्व परिस्थिती चा आढावा घेत आर्थिक भांडवलासाठी त्यानी मदत केली,खाट विणण्यांची कला अवगत आहे. पण आवश्यक असा मोबदला मिळत नाही मंग त्यासाठी खाट बनवून व खाट विणून ते आवश्यकतेनुसार त्यांना चांगला मोबदला मिळू शकतो. यासाठी त्यांना जे काही खाट बणवण्यासाठी साहित्य साधन लागतं त्यासाठी थोडा आर्थिक हातभार लागावा ह्या उद्देशाने डोनेट एड सोसायटीचे दातृत्ववान दाते तृप्ती व वरून पुट्टेवार परिवाराने त्यांच्या लेकीच्या रुचा हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खाट बनविण्यासाठी लागणारे साहित्य घेऊन दिले.

कोरोनाच्या स्थितीत आमच्या कार्याचा शुभारंभ झाला, आणि आमच्या मेहनतीला व कला गुणांना भरभरून यश मिळेल हि आशा बाळगतो.

माणसामध्ये अनेक कला अवगत असतात परंतू जोपासली का जात नाही कारण परिस्थितीनुसार तो खचला जातो,आपल्या कुटुंबातील दैनंदिन उदरनिर्वाहासाठी तो गरजेनुसार एखांदी कला अवगत करतो आणि त्यातून जीवन जगतो पण आजच्या स्थितीत सर्व काही नव नवीन कला वस्तू निघाल्या त्यात गरीब असो श्रीमंत त्यात काही भेद नाही उरत फक्त समाधान एवढेच असते जी वस्तू माझ्याकडे नाही ती वस्तू मी मिळवणार आणि त्यात माझे समाधान होणार मग जेवढं आहे त्यात आपण समाधान मानलं पाहिजे कि नाही,

नवीन कला खाटांचे बघितल्यावर मला इतकं समाधान वाटतं, नव्या कला मी अंदाज माझ्या विचारांशी बांधला माझा उद्देश आहे.की आपण अवगत केलेली कला कधी वाया जात नाही ती जोपासल्यावर समृध्दीची भरभराट होतेच आपल्या जीवनात त्या साठी लागणारे पाठबळ.

आपल्या कला गुणांना वाव देणारे डोनेट एड सोसायटीचे सर्व सहकारी कार्यकर्ते व दातृत्ववान दाते यांनी दुर्बल परिस्थितीला सक्षम बणवण्यांचा एक वसा घेतला आहे.आज खरोखर बिकट परिस्थितीवर मात करता येईल. हा दृढ विश्वास डोनेट एड सोसायटीच्या सर्व टिमने प्रत्येक निराधारांमध्ये व दुर्बल घटकातील लोकांमध्ये जागवला, डोनेट एड सोसायटीचा हा संकल्प प्रत्येक महिला व पुरुष यांना बिकट परिस्थितीतून मागे न सावरता व न खचता सक्षम होऊन प्रगतिचा कार्य ध्वज फडकवायचा आहे.

आज आई खूप खुश आहे तिच्या मूळे आमच्यात रुजलेल्या कलेला आज वाव मिळाला व तिचा आत्मविश्वास पुन्हा जोमाने वाढला व ही रणरागिणी तब्बेतीची तक्रार न करता पुन्हा तिच्यात अवगत असणाऱ्या खाट विणण्याच्या कलेत झोकून देऊन काम करू लागली.तिच्या डोळ्यात एक चमक दिसत आहे जीवनात आशेचा किरण निर्माण झाला आहे

खाटांचे महत्व

 • १-कोणाचेही कंबर मान पाठ दुखत असेल त्याच्या आरामासाठी योग्य ठरते
 • २-खास करून म्हाताऱ्या माणसासाठी आरामदायक असते कारण वय झाल्यानंतर शारीरिक त्रास होण्यास सुरुवात होते उदाहरणात चालताना येणे पाठ कंबर दुखणे हाताला पायाला मुंग्या येणे नस चालू करण्याचे काम करते.
 • ३-अर्धा उपचार आपण बऱ्यापैकी घरी करू शकतो
 • ४-स्त्रियांच्या शारीरिक मानसिक आरोग्यासाठी योग्य असते
 • ५-घरगुती कामासाठी आल्हाददायक असते

दिवसेंदिवस खाट कालबाह्य का होत चाललेली आहे

पूर्वीचे लोक पहिले खाट वापरत असे त्यामुळे आरोग्यास कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही परंतु वाचवत मोठ्या प्रमाणात आरोग्यास हानी होण्याची मदत झाली आहे मुख्य कारण म्हणजे आपल्या डोळ्यासमोर आहे नवीन सोपा पलंग यामुळे या काळात ठीक कालबाह्य होत चालला आहे कारण आजच्या युगात फॅशनेबल पद्धत झालेली आहे आणि सोपे आहे याचे मुख्य कारण म्हणजे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे पलंग आणि सोपी आरोग्यास हानिकारक आहेत पलंग सोफा मुळे मोठमोठे आजार होण्याची शक्यता जास्त असते शरीराचे अवयव ला इजा होते जसे सांधे दुखणे असेच बऱ्याच प्रकारचे आजार होण्याची शक्यता असते.

पूर्वीच्या काळात बलवान शक्ती जास्त होती परंतु आजच्या काळात काही दिसत नाही आजच्या काळात तरुण आळस ला आहे खाटचा वापर पुन्हा जीवनात कधी पण येऊ शकतो.

खरंच आजच्या काळात कालबाह्य होत चाललेला आहे आपली कला आपल्या हातात नवा आकार देऊ खाटला,मग यश येईल वाट्याला दैनंदिन जीवनात आपली कला सामोरे आणता आली पाहिजे योग्य कला जोपासता आली पाहिजे कला हेच जिवन


लेखन: जितेंद्र बाळू कांबळे
(माझी आई आजची रणरागिणी ह्याचा मला सार्थ अभिमान आहे)डोनेट एड सोसायटी रणरागिणी उपक्रम महिला तेथे सक्षम प्रगतीच्या पाऊल खुणा

हिरमुसलेल्या मनाची अविरत धाव शेवटी पूर्ण


नागपूर पासून अवघ्या 22 km अंतरावर असलेले गाव नागलवाडी येथे मांग गारुडी समाजाची वस्ती आहे येथील लोकांचा व्यवसाय भीक मागणे , कचरा वेचने हा आहे त्यामुळे येथील मुले मुली आपल्या घरच्यांच्या व्यवसायात तयांचा हाथ पकडून काम करीत असतात.

मागील 5 वर्षांपासून युवा चेतना मंच च्या वतीने या मुला मुलींना शिक्षनाच्या मुख प्रवाहात आणण्याचे कार्य सुरू आहे काही प्रमाणात यश पण आले आहे य चालते.

येथे काही मुली आहे त्या कचरा वेचायला जातात त्या मुलींनी हे काम करू नये यासाठी तयांना शिवणकाम शिकविण्यात आले व तयांना शिलाई मशीन देण्यात आली त्या कापडी पिशव्या , मास्क, स्वतःचे कपडे शिवण्याचे कार्य करीत आहे ते.

याच मुली पैकी नेहा लोंढे, आचल लोंढे, समिता लोंढे, राखी लोंढे यांनी आम्ही पण शिवणकाम करायला तयार आहे,त्याना शिलाई मशीन ची आवश्यकता आहे असे मा.दत्ता शिर्के यांनी दास च्या कार्यकर्ता किशोरी अग्निहोत्री व नितीन घोडके यांना कळवले सर्व कार्याचा आढावा घेत,


दात्यांच्या मार्फत

श्री.आदित्यम् व रेवती जोशी यांनी नवरात्री निम्मित व अधिकमासात घेतलेल्या संकल्पाच्या व वाढदिवसाच्या निम्मित त्यांच्या लाडक्या लेकी शर्वरी व समन्वी यांच्या नावाने शिलाई मशिन डोनेट एड सोसायटी च्या माध्यमातून दिले. दात्यांचे मनापासून आभार

याच नवरात्रउत्सवाच अवचित साधत युवा चेतना मंच च्या कार्यकर्त्यांनी दास च्या माध्यमातून मिळालेली शिलाई मशीन गरजूंपर्यंत पोहचवली.

भारतात कोरोनाने शिरकाव केला तेव्हा सर्वत्र हाहाकार माजला कोणी घराचा बाहेर सुधा निघे ना पण या सर्व गोष्टीला वगळता नागपूर नजीकच्या नागलवाडी या गावातील लोकांना एक हात मदतीचा म्हणून सहकार्य करत हे कार्यकर्ते सहकार्य करत होते.

समाजाचे याच काम म्हणजे केर कचरा जमा करणे आणि रोजची आपली पोटाची खडघी भागवणे सोबत लाहणग्या ना शाळेत न धाडता कचरा गोळा करायला घेऊन जाणे कारण एकच पोटाची भूक जेव्हढा कचरा जास्त जमा होईल तेव्हढे पैके जास्त भेटतील पण या सर्व गोष्टीला अपवाद ठरत या गावातील काही मुली अश्या आहेत ज्यांना आपला स्वाभिमान प्रिय वाटतो ज्यांना स्वतःला काम करण्याची इच्छा होती.

"साहेब तुम्ही फकस्त काम द्या आम्हले नाही वाटत का तुमचा सारख आम्ही गाडी घावं साहेबा सारख रहाव तुम्ही आमाले काम द्या आमी कचरा वेचने सोडुन देऊ, हे शब्द कुठल्याही सामान्य व्यक्तीला आकर्षित करून मदतीस बाध्य करणारी होती या गावातील अश्या अनेक मुलीची इच्छा अपेक्षा तीच याच गोष्टीची जाणीव ठेवत युवा चेतना मंच दत्ताजी शिर्के यांनी दास च्या किशोरीताई अग्निहोत्री व नितीन सर घोडके यांच्या बरोबर संपर्क साधला व दात्यांच्या माध्यमातून दास च्या कार्यकर्ते यांच्या क्रियाशीलतेमुळे दाते जोशी परिवार यांच्याकडून,

यंदा चा नवरात्र उत्सव नागलवाडी या गावात साजरा करत त्या मुलींची ओटी त्याचा स्वयंम रोजगाराने भरत आहे त्याचा हाती आता कचरा नाही तर स्वताचं शिलाई मशीन आले.

स्वतच्या स्वाभिमान टिकवत या मुली आता कापडी पिशव्या लहान मुलांचे कपडे व इतर कापडी साहित्य शिवणार त्या हाताना एक बळ म्हणून त्या कापडी पिशव्या शहरातील लोकांन पर्यंत कार्यकर्ते यांच्या नेतृत्वाखाली पोहचवण्यात येईल त्यात आपणही प्रत्येकी एक पिशवी विकत घेत त्यांचं बळ दुप्पट होईल.

आपल्या कलागुणांना वाव देणारे डोनेट एड सोसायटीचे सर्व सहकारी कार्यकर्ते व दातृत्ववान जोशी परिवार यांनी दुर्बल परिस्थितीला सक्षम बणवण्यांचा एक वसा घेतला आहे.आज खरोखर बिकट परिस्थितीवर मात करता आली. हा दृढ विश्वास डोनेट एड सोसायटीच्या सर्व टिमने प्रत्येक निराधारांमध्ये व दुर्बल घटकातील लोकांमध्ये जागवला

डोनेट एड सोसायटीचा हा संकल्प प्रत्येक महिला व पुरुष यांना बिकट परिस्थितीतून मागे न सावरता व न खचता सक्षम होऊन प्रगतिचा कार्य ध्वज फडकवायचा आहे.

धन्यवाद
डोनेट एड सोसायटीडोनेट एड सोसायटी रणरागिणी उपक्रम महिला तिथे सक्षम प्रगतीच्या पाऊल खुणा

समाजबंधच्या कार्याची माहिती व प्रकल्पासाठी दास कडून मिळालेली शिलाई मशीन
मी सचिन आशा सुभाष. आम्ही समाजबंध या सामाचजक संस्थेच्या माध्यमातून २०१७ पासून माचसक पाळी व मचहला आरोग्य या चवषयांवर ग्रामीण व आचिवासी भागात काम करतो.

यामध्ये किशोरवयीन मुली व महिलांसाठी मासिक पाळीविषयी जनजागृतीसाठी 'प पाळीचा: जागर स्त्री अस्तित्वाचा' समुपदेशन सत्र आयोजित करणे, कात्रज- पुणे येथील प्रकल्पात बनवले जाणारे कापडी आशा पॅड महिलांना वापरण्यासाठी एकदा मोफत देणे व शिलाई मशीनवर आशा कापडी पॅड बनवण्याचे प्रशिक्षण देणे असे कार्य चालते.

लैंगिकता शिक्षण, महिला आरोग्य आणि स्वयंरोजगार असे आमचे उद्दिष्ट यातून साध्य होते.

जुलै मचहन्यापासून मी व माझी सहिाररणी शवयरी (समुपिेशक - समाजबंध) रायगड चजल्यातील पेण तालुक्यात कामाला सुरुवात केलेली आहे. हा कातकरी आचिवासी बहुल भाग आहे. मजुरी हाि मुख्य व्यवसाय असणाऱ्या या समाजात चशक्षणािे प्रमाण अत्यंत कमी आहे.

या लोकांकडे ना शेती आहे, ना पिढीजात व्यवसाय, ना नोकरी. त्यामुळे शहरांच्या जवळ असूनही मुख्य प्रवाहापासून कोसो दूर असा हा समाज आहे. इथे कातकरी, धनगर, ठाकर अशा आदिवासी वाड्यांमध्ये जाऊन आम्ही पाळीविषयी जनजागृती, कापडी आशा पॅड निर्मिती केंद्र तसेच घरच्या घरी पॅड बनवण्याचे प्रशिक्षण देण्याचे काम करणार आहोत. त्यासाठीचे प्रत्येक घराचे सर्वेक्षण सध्या सुरू आहे.

कामाच्या पचहल्या टप्पप्पयात आम्ही गागोिे बुद्रुक या गावातील चवनोबानगर कातकरी वाडीवर आशा पॅड चनचमयती केंद्र सुरू करत आहोत. इथं शून्यातून सगळं उभं करण्यासाठी बरीि आचथयक कसरत करावी लागणार हे चनचिति आहे.

प्रकल्प म्हणून वापरण्यात येणाऱ्या समाज मंदिराच्या खोलीला पत्रे बसवण्यापासून ते रंगरंगोटी, light- पाण्याची व्यवस्था, ४ शिलाई मशीन, शिलाई साहित्य, कापड विकत घेणे असं बरंच खर्चिक काम आहे. काम सुरू होण्यासाठी आम्हाला शिलाई मशीनची आवश्यकता होती.

माझ्या डोक्यात पहिल्यांदा कुणाचा विचार आला असेल तर तो 'दास' चा आला. मी याबद्दल Donate Aid Society च्या किशोरी ताई अग्निहोत्री व नितीनदादा घोडके यांना कळवले.दादा व ताई पुण्यातील कात्रज येथील प्रकल्पाला भेट देऊन गेल्या होत्या त्यामुळे त्यांना समाजबंधच्या कामाची कल्पना होतीच.

शिवाय पौड मधील कातकरी वाड्यांवर देखील हे काम मिळून करण्यासंदर्भात आमचं बोलणं झालेलं पण कोरोनाने ते काही होऊ शकलं नाही. प्रकल्पभेट करूनच मदत करणं - घेणं योग्य हे माहीत असताना ही सध्याच्या परिस्थितीत भेटणं शक्य नसल्याने व कामाची तातडीची गरज लक्षात घेऊन किशोरी ताईंनी पुढाकार घेतला व हालचाली सुरू झाल्याा.

किशोरी ताईंनी तूर्तास एक मशीन देते असं कळवलं कारण त्याना लाभलेली दात्यांची साथ त्यांच्या विश्वासावर व त्यांचे सेवाकाऱ्याची तत्परता लक्षात घेऊन त्यांची मैत्रीण पूर्वा गुल्हाने यांनी त्यांच्या लाडकी लेक सारा हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गरजूंसाठी काहीतरी द्यायचे ठरवले होते तेहवा महिला तिथे सक्षम प्रगतीच्या पाऊल खुणा हा उपक्रमा बद्दल किशोरी ताईंनी त्यांना माहिती दिली, त्याना महिला सक्षमीकरण हा उपक्रम मनाला खूप भावला आपली मदत नक्कीच गरजूंच्या जीवनात आशेचा किरण जगवू शकतो असे भरभरून बोलत त्यानी शिलाई मशीन देऊ केले, व आपली मदत खरंच योग्य ठिकाणी गेली याचे त्याना समाधान लाभले

खरंच दात्यांच्या दातृत्वामुळे समाजबंध ला Novel कंपनीची Full shuttle tailor मशीन मोटरसह प्रकल्पासाठी मिळाली

आता आमच्या कामाला निश्चितच गती येईल. या माध्यमातून महिला आरोग्यावर काम तर होईलच पण आपल्या सर्वांची अशीच साथ राहिली तर कातकरी महिलांच्या रोजगाराच्या दृष्टीने ही विधायक काम घडेल. Donate Aid Society च्या सर्व team व दात्यांचे मनःपूर्वक आभार !

दाते:गुल्हाने परिवार यांचे शतशः आभार असेच दातृत्वामुळे आम्हाला पाठबळ मिळते.

लेखन :आपला विश्वासू
सचिन आशा सुभाष
समन्वयक - समाजबंध.
samajbandhindia@gmai.com

धन्यवाद
डोनेट एड सोसायटीडोनेट एड सोसायटी रणरागिणी उपक्रम महिला तिथे सक्षम प्रगतिच्या पाऊल खुणा

माधव सेवा तिथे डोनेट एड सोसायटीचा ठेवा
महिलांचा आधार होऊनी रणरागिणी बनविण्यासाठी दास घेते वसा
दुर्बलतेला प्रगत बनवू सक्षम मार्ग असा
आयुष्य सुखकर होईल आता असाह्य महिलांचा बनणार दास दाता
महिलांसाठी आज आहे दास भाग्यविधाताग्रामीण भागातील दुर्बल घटकातील महिला यांच्यात कार्यकुशलतेची विकसित भावना जागवून डोनेट एड सोसायटी एक दुवा बनुन कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आजतागत ताकदीने महिला सक्षमीकरणासाठी झटत आहेत.

आज महिला सक्षमीकरणासाठी किंचीत असे पाठबळ मिळत असते, किंवा दुर्लक्ष करून विसरून जाणे अशा प्रकारे महिलांच्या कार्यगुणाचा दिप कसा पेटनार महिलांमध्ये आशेचा किरण कधी फुलणार?

हा विषय असाह्य दुर्बल महिलांची जाणीव ठेवून डोनेट एड सोसायटीचे सर्व सहकारी व दातृत्वान दुर्बल घटकातील महिलांसाठी ज्या हेतूने साह्य करत आहे.

ते म्हणजेच दु:खद जीवनातून सुखकर आयुष्य जगावं ह्या हेतूने तात्पुरत्या वस्तूंवर संपुर्ण आयुष्य आपण जगु शकत नाही तर आयुष्यभर पुरेल आशी वस्तु त्या महिलेच्या कार्यगुणाच्या आधारित देणे,आणि स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी त्या महिलेला पाटबळ करणे हे वास्तविक दर्शन आपणास डोनेट एड सोसायटीच्या कार्य संचारातून बघण्यास मिळते.

ज्यात अनेक महिलांचं भवितव्य निश्चित रूपाने असाह्य नसुन आनंदरूपी थाटलं आहे. महिलांनाची खरी गरज काय आहे.ती कशी पुर्ण करायची नुसतं गोड बोलून भागत नाही किंवा असंख्य प्रश्नांच भांडार खोलून मेंदुचे स्नायु वाया घालवण्या पेक्षा प्रत्येक्षात केलेली गोष्ट बुध्दी श्रेष्ठ असते हे मात्र खरं आहे.

ज्या प्रकारे महिलांना सक्षमतेच्या मार्गावर कसं पोहचवायचं, ह्या उमेदिने महिला तिथे सक्षम प्रगतिच्या पाऊला खुणा जिथे, तिथे दिपज्वलीत झाल्या पाहीजे म्हणून गरूडा सारखं आरूड होणारं,नभात,नभात मजबूत पंखाचं बळ म्हणेजेचं डोनेट एड सोसायटीचं पाठबळ महिला सक्षमीकरणासाठी ताकदिने आपलं कार्य बजावत आहे.

लेखन:-
गौतम केदारनाथ जगताप

धन्यवाद
डोनेट एड सोसायटी